पलूस | दि. २८/०८/२०२१
सांगली जिल्ह्यातील पलूस येथे शुक्रवार दि. २७ ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय जनता पक्षाच्या पलूस तालुका कार्यालयाचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आले होते.
यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांचे पलूस नगरीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी पलूस येथील शिवतीर्थावर चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नेते, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांना संबोधित केले.
या पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला आपल्या समस्या मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. याचा अधिकाधिक उपयोग सर्वसामान्य जनतेला होणार आहे. तसेच पुढील काळात पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहे असे यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
यावेळी मा. आमदार पृथ्वीराज देशमुख (बाबा) अध्यक्ष. भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा ग्रामीण मा. मकरंद भाऊ देशपांडे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री, मा. राजाराम गरुड माजी जिल्हाध्यक्ष भाजपा, मा. दीपक मोहिते सभापती पंचायत समिती पलूस, मा. सौ. अश्विनी ताई पाटील जिल्हा परिषद सदस्य, मा. सुरेंद्र चौगुले सरचिटणीस भाजपा सांगली, मा. रोहित नाना पाटील अध्यक्ष युवा मोर्चा सांगली जिल्हा, मा. विजय काका पाटील पलुस तालुका अध्यक्ष, मा. सागर सूर्यवंशी युवा मोर्चा अध्यक्ष पलुस तालुका, मा. रोहित पाटील नवनियुक्त पलूस शहर युवा मोर्चा अध्यक्ष, युवानेते माननीय विश्वतेज संग्राम देशमुख व भारतीय जनता पार्टीचे पलूस तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.