yuva MAharashtra भिलवडी येथे एक व अंकलखोप येथे दोन अशा तीन व्यक्तींची एकाच दिवशी आत्महत्या.....

भिलवडी येथे एक व अंकलखोप येथे दोन अशा तीन व्यक्तींची एकाच दिवशी आत्महत्या.....


भिलवडी व अंकलखोप परीसरात एकच खळबळ.....
दि.३१ / ०८ / २०२१

घटना नं. - १ -------
पलूस तालुक्यातील अंकलखोप, (औदुंबर मळीभाग ) येथे राहणारे गणेश बाळासो सुर्यंवशी वय ४० वर्षे यांनी दारुच्या नशेत दि.३०/०८/२०२१ रोजी पहाटे 
५ : ०० वा.चे पूर्वी औदुंबर फाटा येथे असलेल्या रामफळाच्या झाडास दोरीने गळफास लावून  मयत झालेबाबत वर्दीदार इंद्रजीत बाबासो सुर्यवंशी वय-३३ वर्षे रा. अंकलखोप, औदुंबर मळीभाग यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात वर्दी दिल्याने  भिलवडी पोलीस ठाण्यात  बाळासो सुर्यवंशी यांची अकस्मात मयत अशी नोंद झाली असुन सदर घटनेचा  पुढील तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एम.एम. घस्ते  ब.नं.४०६ हे करीत आहेत.

घटना नं. २ -------
अंकलखोप (नागठाणे फाटा) ता.पलूस येथील राहणारे गणपती रावसाहेब चौगुले वय ४७ वर्षे यांनी त्यांच्या राहत्या घरी स्लॅबच्या छतास असलेल्या  फॅनला दोरीने गळफास घेवुन दि.३०/८/२०२१ रोजी सकाळी ०७.०० वा.चे पुर्वी मयत झाले बाबत वर्दीदार महादेव रावसाहेब चौगुले वय ५१ वर्षे रा. अंकलखोप (नागठाणे फाटा) ता.पलूस यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात वर्दी दिलेने भिलवडी पोलीस ठाण्यात  गणपती रावसाहेब चौगुले यांची अकस्मात मयत अशी नोंद झाली असून सदर घटनेचा  पुढील तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण सुतार ब.नं.१७४५ हे करीत आहेत...

घटना नं. ३ -------
भिलवडी ता.पलूस येथील राहणारे अनिकेत धनपाल वाळवेकर वय-३६ वर्ष यांनी त्यांच्या राहत्या घराच्या  दुसऱ्या  मजल्यावरुन दि.३०/०८/२०२१ रोजी दुपारी ०२.०० वा उडी मारल्याने त्यांचे वडील धनपाल वाळवेकर यांनी सायंकाळी ०५.३० वा. मयत अवस्थेत सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे अनिकेत धनपाल वाळवेकर यास दाखल केले असले बाबत बर्दीदार सी. एम.ओ. डॉ. निखील , सिव्हील हॉस्पीटल सांगली यांनी फोनवरुन भिलवडी पोलीस ठाण्यात कळविलेने भिलवडी पोलीस ठाण्यात अनिकेत धनपाल वाळवेकर यांची अकस्मात मयत अशी नोंद झाली असून सदर घटनेचा  प्राथमिक तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत....


अशाप्रकारे भिलवडी येथील एक  व  अंकलखोप येथील दोन  अशा एकूण तीन व्यक्तीने वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी  आत्महत्या केल्यामुळे भिलवडी व अंकलखोप परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे....