माळवाडी ता.पलूस येथील रोहित शिवाजी नलवडे यांनी दि. २५ / ०८ / २०२१ रोजी रात्री १०:०० वाजताच्या सुमारास महाविकास आघाडी सरकारमधील काही प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांचे गोंधळी वेशातील संपादित केलेला फोटो त्याच्या फेसबुक या इलेक्ट्रॉनिक माध्यमावर पोस्ट करून महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख नेते मंडळींचा नावलौकिकास बाधा निर्माण होईल असे कृत्य करून सदरचा गुन्हा केलेला आहे.
म्हणून रोहित शिवाजी नलवडे यांंच्या विरुद्ध भिलवडी पोलिस ठाण्यात गु.र.नं.१२२ / २०२१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस हवलदार पी. आर .सुतार हे करीत आहेत..