yuva MAharashtra समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थेस राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संस्था सेवारत्न पुरस्कार जाहीर..

समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थेस राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संस्था सेवारत्न पुरस्कार जाहीर..


मनुष्यबळ अकादमीतर्फे गुणिजन गौरव महासंमेलनमध्ये होणार प्रदान...

सांगोला | दि. २७ / ०८ / २०२१

समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था वाटंबरे या संस्थेस , मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी च्या वतीने गुणिजन गौरव महापरिषद २०२१ मध्ये 'राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संस्था सेवारत्न'
पुरस्काराने ऑनलाइन सन्मानित करण्यात आले.
 समर्थ बहुउद्देशीय संस्था ही गेली चार वर्षे वेगवेगळ्या सामाजिक , सांस्कृतिक , शैक्षणिक , आर्थिक, कृषी , आरोग्य , नोकरी मार्गदर्शन अशा वेगळ्या विषयावरती कार्य करीत आहे.
व्यसनमुक्त भारत अभियान राबवून महाराष्ट्रामध्ये २५० व्यसनमुक्ती केंद्रामार्फत २५००० पेक्षा जास्त लोकांना व्यसनमुक्त बनविण्यात आले , संस्थेने ४५ व्यक्तींना व्यसनमुक्तीदूत व ७ आदर्श व्यसनमुक्ती केंद्र पुरस्काचे वितरण केले , व्यसनमुक्तीच्या पुस्तकाची निर्मिती केली, दुष्काळामध्ये वाटंबरे व चिनके या गावामध्ये जनावरांसाठी शासनाचा चारा छावणी उपक्रम राबवून जनावरांच्या चारा व पाण्याची सोय केली , साने गुरूजी कथामालेचे आयोजन करून साने गुरुजींचा  विचार रुजवण्यास मदत केली , आरोग्य शिबिरांचे आयोजन , नोकरी मार्गदर्शन केंद्र मार्फत हजारो बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या , एस एज्युकेशन मार्फत व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण , ग्राम स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन , महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करणे ,  आरोग्यविमा मार्गदर्शन , व्याख्यानांचे आयोजन अशाप्रकारे संस्थाने समाजातील सर्व क्षेत्रासाठी काम करून एक आदर्श निर्माण केला आहे. यावर्षी दै. तुफानक्रांती या वृत्तपत्र समूहाने 'आदर्श सामाजिक संस्था ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..
        समर्थ संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे , उपाध्यक्ष महेश दत्तू ,  सचिव प्रमिला साळुंखे , खजिनदार मेघश्याम सुरवसे , इक्बाल पाटील , शरदचंद्र पवार , लता पाटील यांनी संस्थेच्या विकासासाठी केलेल्या कार्याचे व घेतलेल्या परिश्रमाचे चीज झाले असून यासाठी संस्थेचे सभासद व हितचिंतकांनी अभिनंदन केले व  पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.