yuva MAharashtra वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीच्या दौऱ्याचे पूर्व नियोजन करण्यासाठी मिरजेत बैठक संपन्न...

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीच्या दौऱ्याचे पूर्व नियोजन करण्यासाठी मिरजेत बैठक संपन्न...

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीच्या दौऱ्याचे पूर्व नियोजन करण्यासाठी मिरजेत बैठक संपन्न...


मिरज 
दि.1 सप्टेंबर 2021

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर व राज्य कमिटीचा संपुर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी दौरा सुरू आहे. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिका निवडणुका लक्षात घेऊन राज्यव्यापी दौरा सुरू आहे. राज्य कमिटीचा लवकरच दौरा सांगली जिल्ह्यात होणार आहे त्या अनुषंगाने राज्य कमिटीने नियुक्त केलेल्या नियोजन समितीने आज सांगली जिल्ह्यात राज्य कमिटीचा दौरा यशस्वी करणे व कार्यकर्ता प्रशिक्षण,मेळावा,आगामी निवडणुकीचे नियोजन,पक्षाची बांधणी मजबूत व्हावे यासाठी नियोजन  करण्याकरिता सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हितचिंतक यांची बैठक मिरज येथे आयोजित करण्यात आली होती. 


या बैठकीत संघटन व पक्ष बांधणी मजबूत करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला तसेच कार्यकर्त्यांना तळागळात काम करताना येणाऱ्या अडी- अडचणी जाणून घेण्यात आल्या व राज्य कमिटीचा दौरा यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते,हितचिंतक उपस्थित होते.

याच बरोबर सदर समितीचे उपस्थित मध्ये आरपीआय पक्षातून श्री                   काबंळे, बिळुर गामपंचायत सदस्य श्री.                            कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये अनेक कार्यकर्ते सोबत जाहीर प्रवेश केला.समितीचे वतीने मान्यवरांनी पक्ष मजबूत करून,अनेक समाजातील लोकांना एकत्र करून पक्षाचे ध्येय धोरणा विषयी लोकांना प्रबोधन करणेत यावे  म्हणाले,महिलांना प्रमुख जबाबदारी द्या म्हणाले,युवक संघटन व अनेक जाती-जमातीना पक्षात सामावुन घेण्याचा सल्ला दिला. 


तसेच काम करताना बारीक सारीक गोष्टीचा नियोजन करावे.पदाधिकारी व कार्यकर्त्य यांच्यात सन्मवयाने कामे होणे गरजेचे आहे.पक्षातील जुने व वरीष्ठ लोकांनी नविन लोकांना विश्वासात घेवुन काम करावे.अनेक समाज व आपल्या आसपासच्या लोकांना पुढाकार घेवून भेट पक्षाची ध्येय धोरणे अनेक पर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन केले.   


   सदर  संघटन समीक्षा व नियोजन समितीमध्ये चंद्रकांत खंडाईत, बाबासाहेब कांबळे, राजरत्न फडतरे, शाकीर तांबोळी, अतूल बहुले, प्रा. सोमनाथ साळुंखे, प्रा. सम्राट शिंदे, डॉ. क्रांती सावंत इ. मान्यवरांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे तर स्वागताध्यक्ष सांगली जिल्हाध्यक्ष (उत्तर) राजेश गायगवाळे हे होते. 


यावेळी गौतम लोटे, अमित वेटम, अनिल मोरे, संजय कांबळे, उमर फारूक ककमरी, प्रशांत कदम, सुमेध माने, सुनील कोळेकर, मनोहर कांबळे, ऍड. प्रशांत वाघमारे, डॉ. राजेश साठे, अमोल साबळे, राजेश क्षीरसागर, हरीश वाघमारे, केतन माने, चंद्रकांत खरात, राजू कांबळे, अमर माने,वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, किरण कांबळे, दिनकर बोकने, राजू पवार, अरुण थोरात, जालिंदर कांबळे आदी उपस्थित होते.