yuva MAharashtra माळवाडी ता.पलूस येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न... नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

माळवाडी ता.पलूस येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न... नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...



माळवाडी ता.पलूस येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न.. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

भिलवडी | दि.१६/०९/२०२१

आष्टा क्रिटिकेअर हॉस्पिटल , आजी-माजी सैनिक संघटना (भिलवडी) व माळवाडी ग्रामपंचायत   यांच्या संयुक्त विद्यमाने माळवाडी पाण्याची टाकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी  शिबीर आयोजित करण्यात आले होते.


 शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व तपासणी, औषधे, डायबीटीस (रक्तातील साखर) तपासणी, रक्तदाब तपासणी, इ.सी.जी. अश्या सुविधा माळवाडी येथील जनतेला  मोफत उपलब्ध व्हाव्यात या हेतूने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सुमारे २१० रुग्णांच्या विविध तपासण्या निःशुल्क करण्यात आल्या.




हे शिबिर आयोजित करताना ग्रामपंचायत माळवाडी आजी माजी सैनिक संघटना जी.के शेख व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी व  द.जनशक्ती न्युज चे संपादक भाऊसाहेब रुपटक्के यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 


या शिबिराचे उद्घाटन आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार बापू पाटील व माळवाडी येथील ज्येष्ठ नागरिक निजाम तांबोळी (गुरुजी) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. 


यावेळी माळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजिंक्यकुमार कदम , आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार (बापू) पाटील , महादेव (बापू) पाटील , प्रकाश नेमिनाथ चौगुले , कयूम पठाण , जी.के. शेख व गावातील नागरिक उपस्थित होते. 


यावेळी आष्टा क्रिटिकेअर हॉस्पिटलचे तज्ञ डॉ.संतोष व्हटकर, डॉ.ऐश्वर्या जाधव, श्री. प्रशांत शेलार , व सहकारी श्री. पवन मस्के-पाटील, श्री. सनी मोरे, श्री.सतीश धनवडे, श्री. रोहित शेळके व कु.मनस्वी यादव उपस्थित होते.