भिलवडी | दि.17/09/2021
माळवाडी (भिलवडी) ता.पलूस येथे सखी महिला मंडळ यांच्या वतीने गौरी गणपती सणाच्या निमित्ताने महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन हसीना शेख यांनी केले होते.
गौरी गणपतीच्या सणाचे मंगलमय वातावरण असल्याने सखी महिला मंडळ मधील महिलांनी अतिशय सुंदर अशा वेशभूषा करून या स्पर्धेमध्ये उत्कृष्ठ असा सहभाग घेऊन गौरी गणपतीचा उत्सव विविध कला दाखवून साजरा केला.तसेच या स्पर्धेमध्ये महिलानी गौरीच्या गाण्यावर फुगड्या,झिम्मा,पिंगा,कोंबडा,सूप नाचवने,घागर घुमावने अशा सुंदर कला सादर केल्या.
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून स्मिता वहिनींनी महिलांसाठी पलूस येथील ट्रेनिंग ची माहिती सांगून महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी राखी निर्मिती स्पर्धेची बक्षिसे वाटण्यात आली.करिश्मा आवळे,स्मिता माळी, रामेश्वरी जोशी यांचे कौतुक हसीना शेख मॅडम यांनी करत बक्षिसे वाटप कली.महिलाना घरी बसून काम करणेसाठीचे मार्गदर्शन केले.करिश्मा आवळे यांनी नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली व या स्पर्धेचे खास आकर्षण करिश्मा आवळे यांचे नृत्य ठरले.या कार्यकमाचे नियोजन आणि आभार परवीन शेख यांनी केले.
या स्पर्धेदरम्यान महिलांनी खूप आनंद व्यक्त केला.महिलांना कामाच्या संधी उपलब्ध करून सक्षम बनविणे हा उद्देश ठेऊन अशा उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे मत हसीना शेख यांनी मांडले.