पोखर्णी गावचे सरपंच व ग्रामसेविका यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराचा डि. पी. आय. पक्षाच्या वतीने पर्दाफाश करणार...
वाळवा | दि. ३०/०९/२०२१
पोखर्णी तालुका वाळवा येथील सरपंच सौ.रेखाताई पाटील व ग्रामसेविका मोरे मॅडम यांचा ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी सुरू आहे. अनेक योजनेच्या कामामध्ये भ्रष्ट कारभार केला आहे. याचा पर्दाफाश करण्यासाठी सर्व माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेऊन गटविकास अधिकारी मा. आबासाहेब पवार इस्लामपूर तहसिलदार प्रदीप उबाळे साहेब यांंना प्रत्यक्ष भेटून माहिती दिली आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, समाज कल्याण अधिकारी याना प्रत्यक्ष भेटून पोखर्णी येथील गैर कारभाराची माहिती निवेदनाद्वारे व प्रत्यक्ष भेटून दिली आहे. या अनुषंगाने १४ ऑगस्ट रोजी इस्लामपूरचे गटविकास अधिकारी व तहसिलदार सबनीस साहेब यानी डि पी आय पक्षाच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन प्रोसिडिंग केले आहे. तरी सुद्धा पोखर्णी ग्रामपंचायतच्या प्रशासना मध्ये कोणताही बदल झालेला नाही. म्हणूनच पुन्हा दिनांक १८/१०/२०२१ रोजी इस्लामपूर गटविकास अधिकारी कार्यालया समोर पर्दाफाश आंदोलन करण्यात येणार आहे.
दलित वस्ती सुधार योजना १४ वा वित्त आयोग १५ वा वित्त आयोग व जन सुविधा योजना, स्थानिक आमदार फंड तसेच खासदार फंड सर्व शिक्षा अभियान मधून व शाळेसाठी येणारा निधी ,शालेय पोषण आहार तसेच अनेक योजनांच्या मध्ये भ्रष्ट कारभार झाला आहे.
ग्रामसेविका मोरे मॅडम पोखर्णी गावामध्ये हजर झाल्यापासून वेळेवर कधी सुध्दा ग्रामपंचायत मध्ये येत नाहीत. ग्रामपंचायत मधील ८अ चे उतारे, जन्म मृत्युचे दाखले, मुलांच्या शिक्षणाचे दाखले, रहिवासी दाखले व इतर कागदपत्रे देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. पोखर्णी संतोषनगर येथील मातंग समाजावर गेल्या २० वर्षामध्ये कोणत्याही योजनेचा एकही पैसा खर्च केलेला नाही. हे जाणिवपूर्वक, राजकीय द्वेषापोटी, जातीय द्वेषापोटी घडत आहे. सध्या सुरु असणार्या दलित वस्ती योजनेंच्या कामांची तातडीने चौकशी व्हावी. ज्या ठेकेदाराना दलित वस्ती सुधार योजनेचा ठेका दिला आहे. व इतर योजनेचा सुध्दा ज्या ठेकेदाराना ठेका दिला आहे अशा या सर्व ठेकेराना काळ्या यादीत टाकून थर्ड पार्टीची सुध्दा चौकशी करावी व इतर सर्व मागण्यांच्यासाठी व भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. याची शासन व प्रशासन यंत्रणेने गांभिर्याने नोंद घ्यावी.
अन्यथा होणार्या परिणामास शासन जबाबदार राहील.
सदरचे निवेदन दि.२९/०९/२०२१ रोजी तहसीलदार सो. इस्लांंपूर व गटविकास अधिकारी सो. वाळवा पंचायत समिती , इस्लांपूर यांना देण्यात आले. यावेळी डि..पी.आय.चे
मा. अशोकराव वायदंडे
जमीन, झोपडी हक्क अभियान प्रमुख DPI
मा. नंदकुमार नांगरे
राज्य उपाध्यक्ष DPI मा. दिलीप कुरणे राज्य संघटक माः वर्षाताई अवघडे पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा DPI
मा. सतिश लोंढे
अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र विभागीय
मा. कबिर चव्हाण
सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्ष
मा. सुरज वाघमारे
वाळवा तालुका अध्यक्ष
मा.रामभाऊ देवकुळे
वाळवा तालुका उपाध्यक्ष , उपस्थित होते.