पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्या..
अन्यथा तहसिल कार्यालयावर मोर्चा काढणार.. मनसेचा सुचक इशारा...
पाच दिवसांचा दिला अल्टीमेटम...
भिलवडी : ता. पलूस दि.५/९/२०२१
कृष्णा नदीला महापूर येऊन एक महिना होऊन गेला तरीदेखील शासनाने भिलवडी व परीसरातील पूरग्रस्तांना जाहीर केलेली तातडीची मदत व नुकसान अनुदान अद्याप पर्यंत मिळालेले नाही. कोरोनाचे संकट , लॉकडाऊन , अतिवृष्टी व कृष्णा नदीला आलेला महापूर या एकामागून एक येणाऱ्या संकटालामुळे भिलवडी व परिसरातील नागरिकांची अवस्था अत्यंत बिकट झालेले आहे. त्यामुळे भिलवडी व परिसरातील पूरग्रस्तांचे तातडीची मदत व अनुदान पुढील पाच दिवसात न मिळाल्यास पलुस तहसिल कार्यालयावर मोर्चा काढत मनसेस्टाईलने आंदोलन छेडणार असल्याचा सुचक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मा. रोहित भोकरे यांनी दिला आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.