yuva MAharashtra साई माऊली उद्योग समूह वारणानगर येथील कैलास पर्वतावरील धबधबा, श्री गणेश गौरी शिवलिंग देखावा..

साई माऊली उद्योग समूह वारणानगर येथील कैलास पर्वतावरील धबधबा, श्री गणेश गौरी शिवलिंग देखावा..









भिलवडी | दि. 14/09/2021

श्री गणेश चतुर्थी
     भाद्रपद शुद्ध ४दिवशी श्री गणेशाची स्थापना करतात.
गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी,  



  
    १) गौरीचे आगमन होत असते. ( ऐकीव माहिती अशी की श्री गणेश बाळाला घेऊन जाण्यासाठी पार्वती माता गौरीच्या रूपांत येते.) सासरवाशी असणार्या मुली माहेरी येतात. व नदीवरून गौरीचे " नव्हान " म्हणून वाजत-गाजत आणतात अंघोळ घालतात त्यादिवशी भाजी-भाकरीचा नैवेद्य देतात.





    २) दुसऱ्या दिवशी  शंकरुबा आणतात, गंगा गौरीला साडी नेसवतात व शंकरुबा  पोशाख करतात गोड नैवेद्य खिर, पोळीचा देण्याची पद्धत आहे, त्यानंतर रात्रीच्या वेळी गाणी म्हणून ववसा घेतात व कान उघडताना  "भानीर वादन" करून गाणी म्हणत_म्हणत  "कान" उघडतात व  "मंगळा गौरीचीओटी भरतात" रात्रभर झिम्मा फुगडी खेळत जागरण करतात. 


    ३) तिसऱ्या दिवशी गौरी गणपती विसर्जन म्हणून सायंकाळी वडी, धपाटे, तळीव, भाजीच्या प्रसादाने नैवेद्य दाखवून  "गौरीचे व गणपतीचे विसर्जन" नदी किंवा विहिरीवरती वाहत्या पाण्यामध्ये करण्याची परंपरा आहे.