yuva MAharashtra मिरज मधील सर्वात मोठी व महत्वाची बातमी... मिरज पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी..

मिरज मधील सर्वात मोठी व महत्वाची बातमी... मिरज पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी..



मिरज मधील सर्वात मोठी व महत्वाची बातमी...
मिरज पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी..



मिरज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी व महात्मा गांधी चौक ,पोलिस ठाणे  यांनी मंगळवार दि. २८ सप्टेंबर २०२१ रोजी  आयोजित केलेल्या  रक्तदान शिबिरास मिरज येथील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद... 



मिरज दि. २९/०९/२०२१

कोरोना आपत्तीमुळे सद्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रक्ताताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सर्व सामान्य व गरीब रुग्णांना या गंभीर परीस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. व रक्त उपलब्ध करण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हि निर्माण झालेली गंभीर परस्थिती लक्षात घेऊन हा रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शना नुसार ...


मिरज येथील साय्यक पोलीस निरीक्षक व महात्मा गांधी चौक,पोलीस ठाणे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
" कोरोना महामारी सोबत संपूर्ण जग लढत आहे.. आपण देखील  " रक्तदान " करुन या लढ्यात सहभागी होऊया ..असे अवाहन  साय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी मिरज येथील तरुणांना केले होते. 


या अहवानास प्रतिसाद देत मिरज येथील नागरिकांनी व विषेशतःतरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रक्तदान केले.  या  शिबिरात  एकूण २४७ जणांनी रक्त दान केले.


सद्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मिरज पोलिसांनी आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून हा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविला व त्याचबरोबर पोलीस अधिकारी यांच्या सह महिला-पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. 


मिरज पोलिसांनी व मिरज येथील तरुणांनी जपलेली सामाजिक बांधिलकी हि कौतुकास्पद होती. त्यामुळे या रक्तदान शिबिरास  युवा नेते मा.जितेश भैय्या कदम , सुरेश बापू औवटी , युवा नेते दिगंबर जाधव , समीर जाधव यांच्या सह इतर मान्यवरांनी भेट देऊन महात्मा गांधी चौक , पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कौतुक केले.
मिरज येथील आजपर्यंतचे हे सर्वात मोठे रक्तदान शिबीर असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.