भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत चोपडेवाडी येथे महालसीकरण अभियान संपन्न....
भिलवडी | दि. ३०/०९/२०२१
भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत चोपडेवाडी गावांमध्ये घेण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक महालसीकरण अभियानास चोपडेवाडी येथील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आज दि.३० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९:०० ते सांयकाळी ५:०० या वेळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी महालसीकरण अभियान राबविण्यात आले. या महालसीकरण अभियानात चोपडेवाडी येथील एकूण ५० लोकांनी लसीकरण करून घेतले.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेंद्र पवार, यांनी लसीकरण सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांना लसीकरण करून घेण्याबाबत प्रोत्साहन दिले.
यावेळी चोपडेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ इंदुमती शिवराम यादव , उपसरपंच अमोल माने तसेच ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेविका चौगुले मॅडम ,चोपडेवाडी गावचे पोलीस पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका , मदतनीस , आशा स्वयंसेविका व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
त्याचबरोबर या महालसीकरण अभियानास चोपडेवाडी येथील युवा नेते माननीय रवींद्र बापू यादव यांचे देखील विशेष सहकार्य लाभले त्याचबरोबर सदरचे महालसीकरण अभियान भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांनी पार पाडले...
यावेळी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील १८ वर्षाच्या पुढील जे नागरिक लसीकरणा पासून वंचित राहिले आहेत अशा लोकांनी लसीकरण करून घ्यावे असे आव्हान वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेंद्र पवार यांनी केले आहे.