सुरेंद्रभैया वाळवेकर यांच्या नेतृत्वाखाली पलूस तहसीलदार कार्यालयावर पूरग्रस्तांचा मोर्चा....
तहसीलदार निवास ढाणे यांनी तात्काळ अनुदान व धान्य जमा करू असा विश्वास पूरग्रस्तांना दिला...
भिलवडी | दि.08/09/2021
जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रभैय्या वाळवेकर यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त गावांतील शेतकऱ्यांचा पलूस तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा भिलवडी ते पलूस तहसीलदार कार्यालयापर्यंत होता. या मोर्चामध्ये भिलवडी, माळवाडी भागातील पूरग्रस्त उपस्थित होते,कृष्णाकाठच्या भिलवडी, माळवाडी ब्राह्मनाळ, सुखवाडी ,चोपडेवाडी, खटाव पूरग्रस्त गावासाठी वंचितासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रभैय्या वाळवेकर यांनी पूरग्रस्तांना घेऊन तहसीलदार निवास ढाणे यांना निवेदन दिले .
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर म्हणाले भिलवडी मध्ये पूरग्रस्त नागरिकांना 2019 च्या निकषावर लवकरात लवकर सानुग्रह अनुदान मिळावे व ज्या पूरग्रस्तांना अजून पर्यंत धान्य मिळाले नाही त्यांना तात्काळ धान्य द्यावे. ज्यांच्या घरांमध्ये पाणी गेले आहे असे पूरग्रस्त कुटुंब धान्य मिळण्यापासून वंचित आहेत. याच्यामध्ये जर कुणी जाणीवपूर्वक यादीमधील नावे कमी करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी.
शासनाने आम्हाला तात्काळ अनुदान द्यावे व पूरग्रस्त आहे त्यांना धान्य द्यावे अशी विनंती केली. त्याच्यामध्ये पिकाचे नुकसान असेल शेतीचे नुकसान असेल घर पडझड ची यादी असेल त्याच्यामध्ये पारदर्शीपणाने याद्या बनवून त्या लाभार्थ्याला मिळाव्यात व शेतकरी ,व्यापारी ,पूरग्रस्त कुटुंब, अगोदरच कोरोना काळात बेहाल झालेले आहे त्यातच हा महापूर येऊन एक महिना उलटला तरीही सानुग्रह अनुदान मिळाले नाही हे अनुदान तुटपुंजे आहे ते सुद्धा लवकर मिळत नसून हे अनुदान लवकरात लवकर मिळावे अशी विनंती सुरेंद्र भैया वाळवेकर यांनी तहसीलदार निवास ढाणे यांना केली.
सुरेंद्र वाळवेकर यांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर तहसीलदार निवास ढाणे यांनी सर्व पूरग्रस्तांना अनुदान मिळणार आहे. स्थलांतरित झालेल्यांना व घरामध्ये पाणी गेलेल्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येईल व ज्यांना धान्य मिळाले नाही अशांची सुध्दा खात्री करून आम्ही धान्य देण्याची व्यवस्था करु आमच्याकडे सानुग्रह अनुदान पन्नास टक्के रक्कम आत्ता जमा आहे परंतु प्रत्येकी पाच पाच हजार रुपये देण्यापेक्षा प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये अनुदान देण्यासाठी उर्वरित रक्कम आमच्या खात्यावर शासनाने जमा केल्यानंतर आम्ही तात्काळ सानुग्रह अनुदान देऊ असे मत तहसीलदार निवास ढाणे यांनी व्यक्त केले.
यावेळी भिलवडी ग्रामपंचायत सदस्य चौगोंडा चिंचवडे, किशोर तावदर, प्रकाश चौगुले,ऋषी टकले, पिंटू पुजारी,संजय (लाला )चौगुले,वसंत ऐतवडे, नवनाथ एजगर, अविनाश भोई,उल्लास ऐतवडे,सुनील पाटील,सचिन पाटील,संकेत चौगुले, सर्वहीत माने,सतीश माने ,मुकेश कांबळे,आदी पूरग्रस्त उपस्थित होते.