एक गाव.. एक गणपती.. पोलीस प्रशासनाने केलेल्या अहवानास उत्स्फूर्त प्रतिसाद...
भिलवडी ता.पलूस : दि.५/९/२०२१
आगामी गणेश उत्सव सन २०२१ चे अनुषंगाने भिलवडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सध्या वाढत असलेल्या कोरोनाचा पादुर्भाव या अनुषंगाने तसेच शासनाने निर्गमित केलेले गणेश उत्सव मार्गदर्शन सूचने प्रमाणे
भिलवडी , अंकलखोप , नागठाणे , संतगाव , धनगाव , बुरुंगवाडी , हजारवाडी , भिलवडी स्टेशन , खंडोबाचीवाडी , माळवाडी , चोपडेवाडी , वसगडे , सुखवाडी , खटाव , ब्रह्मनाळ येथील पोलीस पाटील , तंटामुक्ती अध्यक्ष , सरपंच - उपसरपंच , तसेच गांवातील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष-उपाध्यक्ष तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची
मा. पोलीस अधीक्षक सो. सांगली , मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो सांगली आणि विभागीय पोलीस अधिकारी तासगाव विभाग तासगाव यांचे मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक के.जे.कोडग
यांनी भिलवडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये जाऊन त्या गावांमधील पोलीस पाटील , तंटामुक्ती अध्यक्ष , सरपंच-उपसरपंच , गावातील सर्व गणेश मंडळातील अध्यक्ष-उपाध्यक्ष व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या बैठका घेऊन त्यांना शासनाचे निर्गमित केलेले गणेशोत्सव मार्गदर्शक सूचनेचे तसेच परिपत्रक याची माहिती देऊन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता " एक गाव... एक गणपती... " हि संकल्पना राबविणे बाबत आव्हान केले.
त्याप्रमाणे संबंधित गावातील गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक के.जे. कोडग यांनी केलेल्या आवाहनास उत्कृष्ट प्रतिसाद देत सार्वजनिकपणे गणेश उत्सव साजरा न करता "एक गांव.. एक गणपती.. " हि संकल्पना राबविणे बाबत एकमताने निर्णय घेतला आहे. तर ग्रामपंचायत सुर्यगाव यांनी गणेश उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत संबंधित ग्रामपंचायत यांनी लेखी पत्र दिले आहे. अशी माहिती भिलवडी पोलीस ठाणे यांनी दिली आहे.