yuva MAharashtra दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न...

दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न...

दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न...


भिलवडी | दि. 04 / 09 / 2021

सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांच्यावतीने इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे ज्येष्ठ सभासद रमेश चोपडे होते प्रारंभी श्री डी. आर. कदम सर यांनी सर्वांचे स्वागत केले तर कार्यवाह सुभाष कवडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वाचनालयाच्या सर्व संचालकांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पुस्तक व वही भेट देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. 
परिमल कदम, पारस पाटील, विनीत चौगुले, स्वाती कुंभार, श्रुतिका नलवडे, सानिका भोसले, समृद्धी मशाळे, अर्चना पवार, प्राची जाधव, भक्ती राडे, कोमल पाटील, अभिराज भगरे, प्रियांका माळी.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीयुत ज. कृ.  केळकर व संजय पाटील सर यांनी केले व आभार प्रदर्शन संचालक हणमंतराव डिसले यांनी केले. या कार्यक्रमाचे कार्यवाह सुभाष कवडे व वाचनालयातील सेवकांनी केले होते. यावेळी डी. आर. कदम, ह. रा. जोशी, सौभाग्यवती मशाळे, कुमारी आरती बाबर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सर्व संचालक ग्रामस्थ वाचक व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. वाचनालयात प्रतिवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो.अशा उपक्रमाचे हे पंचविसावे वर्ष होते.