दलित महासंघ युवक आघाडीचे मजबूत संघटन करणार - सुधाकर वायदंडे यांचे प्रतिपादन....
शिराळा | दि.३०/०९/२०२१
युवकांच्या विविध प्रश्नांसाठी दलित महासंघ युवक आघाडीचे मजबूत संघटन उभा करून युवकांच्या मागे ताकद उभा करणार असल्याचे प्रतिपादन दलित महासंघ युवक आघाडीचे अध्यक्ष सुधाकर वायदंडे यांनी केले.
ते नाटोली ता.शिराळा येथे दलित महासंघ पदाधिकारी निवडीच्या बैठकीत बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक दादासो गायकवाड होते.
सुधाकर वायदंडे म्हणाले,युवक बंधूंची एकजुटीची शक्ती निर्माण करून युवकांच्या न्याय हक्कासाठी व प्रलंबित मागण्यासाठी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मधुकर वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक आघाडी अधिक गतिमान करणार आहे.
शासनानेही युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे परंतु सध्या तरी शासन यात यशस्वी होताना दिसत नाही . युवकांना योग्य मार्गापासुन भरकटु न देता त्यांच्यासाठी,उत्कृष्ट शिक्षण,रोजगाराची संधी शासनाने उपलब्ध करून द्यावी यासाठी लढा उभारणार आहे .
दलित महासंघाच्या शाखा वाढीसाठी प्रयत्न करणे,अन्याय अत्याचाराला वाचा फोडणे,विविध सामाजिक विषयावर आंदोलन करणे,सर्व शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकाला मिळवून देण्यासाठी युवक आघाडी काम करत असल्याचे सुधाकर वायदंडे यांनी सांगितले .
यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मधुकर वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक आघाडी अध्यक्ष सुधाकर वायदंडे यांनी युवक आघाडीच्या शिराळा तालुका अध्यक्षपदी सत्कारसिंह दादासो गायकवाड(नाटोली) तर उपाध्यक्षपदी प्रदीप दंडवते(भाटशिरगाव) यांची निवड केली.
स्वागत व प्रस्तावित राज लोखंडे यांनी केले.
यावेळी सचिन पाटील,सनी बनसोडे,अजित सुतार,गणेश पाटील,प्रथमेश सातपुते,रणजितसिंह गायकवाड,ऋषी कांबळे,सागर कांबळे,प्रशांत माने,बंडा परीट,मंगेश कुंभार,रोहित सातपुते,शेखर कांबळे,अक्षय सातपुते,रामचंद्र सातपुते,राजेश वारे, शशिकांत वारे,गणेश सातपुते,वरद मोहिते,साहिल सातपुते,सूर्यकांत सातपुते,विक्रम कांबळे,अनिकेत सातपुते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.आभार राहुल सातपुते यांनी मानले.