yuva MAharashtra नागठाणे ता.पलूस येथे एकाच रात्री दोन म्हैशींची अज्ञात चोरट्यांनी केली चोरी... नागठाणे गणेश नगर येथील घटना..

नागठाणे ता.पलूस येथे एकाच रात्री दोन म्हैशींची अज्ञात चोरट्यांनी केली चोरी... नागठाणे गणेश नगर येथील घटना..

नागठाणे ता.पलूस येथे एकाच रात्री दोन म्हैशींची अज्ञात चोरट्यांनी केली चोरी...

नागठाणे गणेश नगर येथील घटना..
 




भिलवडी | दि. 10/09/2021

पलूस तालुक्यातील नागठाणे (गणेश नगर) येथे बुधवारी रात्री दोन म्हैशींची अज्ञात चोरट्याने  चोरी केली असल्याचे उघडकीस आले असून, भर वस्तीतील चोरीच्या या प्रकारामुळे नागठाणेसह परिसरात खळबळ उडाली आहे.‌


बुधवारी रात्री पलूस तालुक्यातील नागठाणे  गणेश नगर येथील दिलावर वाकंर यांच्या राहत्या घरासमोर खुंटीस बांधलेल्या म्हैंशीची  अज्ञाताने दोरी कापून म्हैंस पळवून नेली आहे. 


वांकर यांना पहाटे तीन वाजता म्हैंशीच्या शेजारीच असलेल्या गायीच्या हंबरड्यामुळे जाग आली. बाहेर येऊन पाहिले असता, म्हैंस बांधलेल्या जागेवर नसल्याचे दिसून आले. सर्वत्र शोधाशोध सुरू करण्यात आली परंतु कोठेही सापडली नाही. 
तसेच दिलावर वांकर यांच्या घराच्या काही अंतरावर संतोष पवार यांचे जनावरांचे शेड आहे. संतोष पवार यांची ही म्हैंस अज्ञातानी खुट्याला बांधलेली दोरी कापून पळवून नेली आहे.


संबधित म्हैस मालकांनी परिसरात शोधाशोध करून देखील गुरूवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत चोरीला गेलेल्या संबंधित म्हैंशीबाबत कोणतेही धागेदोरे मिळाले नाहीत अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.एकाच रात्री दोन म्हैंशींची अज्ञात व्यक्तींनी चोरी केल्याने नागठाणे सह परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. कृष्णा काठावरील परिसरात वारंवार घडत असलेल्या चोरींच्या घटनांमुळे कृष्णा काठावरील नागरिक धास्तावले आहेत.