पदवीधर आमदार मा. अरुण अण्णा लाड यांच्या स्थानिक विकास निधीतून माळवाडी गावासाठी मंजूर झालेल्या सामाजिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा संपन्न.
भिलवडी | दि. २९/०९/२०२१
माळवाडी तालुका पलूस येथे पदवीधर आमदार मा.अरुण आण्णा लाड यांच्या स्थानिक विकास निधीतून माळवाडी येथे सामाजिक सभागृह मंजूर झाले असून या सभागृहाच्या निर्मितीसाठी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. माळवाडी मधील मागासवर्गीय वस्ती मध्ये सामाजिक सभागृह व्हावे हि संकल्पना व सदर सभागृहाच्या मंजुरीसाठी प्रयत्न माळवाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते व द.जनशक्ती न्यूज चे मुख्यसंपादक भाऊसाहेब रुपटक्के व कुंडलचे सामाजिक कार्यकर्ते बोध्दीसत्व माने यांनी केले आहेत. माळवाडी येथे मंगळवार दि. २८ सप्टेंबर २०२१ रोजी माळवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्या जवळ ग्रामपंचायतीच्या नियोजित जागेमध्ये सामाजिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा पदवीधर आमदार मा.अरुण लाड यांच्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी बोलताना अरुण अण्णा लाड म्हणाले की अशी विविध विकास कामे व योजना आपल्या गावामधे राबवता येतील त्यासाठी लागेल ते सहकार्य आम्ही करू तसेच गावातील अंतर्गत मतभेद विसरून सर्वांनी गावाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत.
यावेळी मा. अरुण अण्णा लाड यांचा सत्कार माळवाडी राष्ट्रवादी अध्यक्ष युवा नेते मा. स्वप्नील तावदर यांनी केला व माळवाडी गावातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी माळवाडीच्या सरपंच सुरैया तांबोळी, उपसरपंच अजिंक्य कदम,ग्रामपंचायत सदस्या सौ.भाग्यश्री वायदंडे , ग्रामपंचायत सदस्य संपत सोनवले , अंकलखोप गटाचे जि. प. सदस्य नितीन बाबा नवले, पलूस तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष मोहन पाटील सर, क्रांती शुगर संचालक महावीर चौगुले, संदिप काटे , शंकर सुपनेकर ,विजय साळुंखे , ग्रामविकास अधिकारी एच.ए.कांबळे , पंचायत समिती बांधकाम विभाग शाखा अभियंता सुनील वाघमारे , सदर कामाचे कॉन्ट्रॅक्टर श्रावणी मोकाशी , सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवती सचिव स्मिता यादव , पलूस तालुका सोशल मीडिया उपाध्यक्ष सचिन मगदूम, माळवाडी राष्ट्रवादी उपाध्यक्ष , राहुल मोरे संतोष मोहिते, राजकुमार बिराजदार सह आदि पदाधिकारी व ग्रामस्थत उपस्थित होते.