yuva MAharashtra मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळातर्फ़े अल्पसंख्याक लोकांना उद्योगधंदा करण्यासाठी आर्थिक मदत द्या...

मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळातर्फ़े अल्पसंख्याक लोकांना उद्योगधंदा करण्यासाठी आर्थिक मदत द्या...



मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळातर्फ़े अल्पसंख्याक लोकांना उद्योगधंदा करण्यासाठी आर्थिक मदत द्या...

वंचित बहुजन आघाडीची  मागणी..



सांगली
दि. २४ सप्टेंबर २०२१ 

     गेल्या दीड वर्षापासून कोरोणामुळे लॉकडाऊन असल्यामुळे पूर्णपणे व्यापार व व्यवसाय सुरू नाही. ह्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य जनतेच्या उद्योगक्षेत्रात ह्याचा फार मोठा परिणाम होतो आहे आणि जनजीवन विस्कळीत झाला आहे तरी आपण मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळामधून अल्पसंख्याक लोकांना कर्जाच्या स्वरूपाने  आर्थिक मदत करावी जेणे करून सध्याच्या परिस्थितीत ह्या लोकांना उद्योगधंदे पुन्हा एकदा चालू करण्यास मदत होईल. 

मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळामधे अल्पसंख्याक लोकांच्या उद्योगव्यवसायासाठी मागील सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये एकही रुपये दिलेले नाही तरी आपण सर्वसामान्य अल्पसंख्याक लोकांच्या मदतीसाठी मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळामधून अल्पसंख्याक लोकांना कर्जाच्या स्वरूपाने आर्थिक मदत करावी. तरी ही मदत करून महाविकास आघाडीचे सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सरकार आहे असा निर्णय घ्यावा.

मागण्या पुढीलप्रमाणे:-

1) शैक्षणिक कर्ज मर्यादा ५ लाखावरून वाढवून ती २० लाखांपर्यंत करण्यात यावी.

2) सध्या महामंडळाच्या कार्यालयात कर्मचारी वर्ग खूपच अल्प आहे तो वाढविण्यात यावा ज्यामुळे कामात गती निर्माण होईल सध्या महाराष्ट्रात ३६ जिल्हे व मुख्यालय या मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या खूपच अल्प आहे व ते ही कायमस्वरूपी नाहीत तरी ह्या महामंडळामध्ये सध्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी करून नवीन कर्मचाऱ्याची त्वरित भरती करण्यात यावी.

3) गेल्या पाच वर्षात शैक्षणिक कर्ज वगळता एक ही व्यवसाय व उद्योग धंद्यासाठी कर्ज योजना सुरू करण्यात आली नाही तरी ही कर्ज योजना तात्काळ सुरू करण्यात येऊन ती नियमित करण्यात यावी.

4) नवीन कर्ज योजनांचा समावेश करण्यात यावे उदा. गृहकर्ज योजना, वाहनकर्ज योजना इत्यादी.

तरी वरील मागण्या पूर्ण करून अल्पसंख्याक समाज्यासाठी न्याय व हक्क मिळवून द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने सांगली उपजिल्हाधिकारी मोसमी बेर्डे यांना निवेदन देऊन मुख्यमंत्री, अर्थमंत्री, अल्पसंख्याक मंत्री यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास  वंचित बहुजन आघाडी कडून जनआदोलन उभे करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, उमरफारूक ककमरी, अनिल अंकलखोपे, वसंत भोसले, विकास कोलप, विनोद कदम, प्रमोद मल्लाडे आदी उपस्थित होते.