पर्यावरण रक्षणासाठी गणेश भक्तांनी पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करावा...
सुभाष कवडे(सर)
भिलवडी |दि.03/09/2021
पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्राच्या वतीने गणेशमूर्तींचे घरीच विसर्जन करा हा उपक्रम याहीवर्षी राबविण्यात येणार आहे अशी माहिती संस्कार केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी दिलेली आहे याबाबत अधिक माहिती सांगताना ते म्हणाले.
गणेश भक्तांनी घरगुती श्रींच्या मूर्तींचे विसर्जन आपल्या घराच्या अंगणात करावे जे भक्त या उपक्रमात सहभागी होतील त्यांना संस्कार केंद्राच्या वतीने ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात येईल.
गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून प्रतिवर्षी याला चांगला प्रतिसाद मिळत आहे तसेच या उपक्रमात सहभागी होणार यांनी आपली नावे सार्वजनिक वाचनालय भिलवडी व साने गुरुजी संस्कार केंद्र(9665221822) इथे नोंदवावीत एका विशेष समारंभात या गणेशभक्तांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच संस्कार केंद्राच्या वतीने गणेश विसर्जनावेळी कृष्णा घाटावर निर्माल्य संकलन ही प्रतिवर्षीप्रमाणे करण्यात येणार आहे.
या पर्यावरण पूरक गणेश उत्सव उपक्रमात जास्तीत जास्त गणेशभक्तांनी सहभाग नोंदवून पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करावे असेही आवाहन संस्कार केंद्राच्या वतीने केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी केले आहे. निर्माल्य संकलनाचे हे 18 वे वर्ष आहे.