yuva MAharashtra पूरग्रस्तांच्या मागण्या मान्य करा अन्यथा उपोषण करू - RPI (A) विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष प्रसाद शिखरे...

पूरग्रस्तांच्या मागण्या मान्य करा अन्यथा उपोषण करू - RPI (A) विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष प्रसाद शिखरे...

पूरग्रस्तांच्या मागण्या मान्य करा अन्यथा उपोषण करू - RPI (A) विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष प्रसाद शिखरे...





पलूस | दि. ७/९/२०२१

आज दि.७/९/२०२१ रोजी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पलुस तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की सानुग्रह अनुदान अद्याप पुरग्रसातांच्या खात्यावर जमा झालेले नाही तात्काळ याबाबत निर्णय घेण्यात यावा व पडझडीचे पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीत ते तात्काळ पुर्ण करावे आणि २०१९ च्या महापुराचे पडझडीचे ९५१००/- अजून काही पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत याबाबत योग्य तो  पाठपूरावा प्रशासनाकडे करावा अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा जिल्हाध्यक्ष प्रसाद शिखरे यांनी दिला.
 

यावेळी दत्ता सदामते, सदाशिव आयवळे, अरूण आयवळे, महादेव आयवळे, सचिन

देसाई,अजय देसाई, आन्नासो देवकुळे,धनाजी जावीर, विशाल आयवळे,रोहित आयवळे, मारूती आयवळे,आनंदा भोसले,अभिजित कांबळे 
यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते.