yuva MAharashtra भुवनेश्वरीवाडी (भिलवडी) येथे अनोखा डोहाळेजेवणाचा अविस्मरणीय सोहळा........

भुवनेश्वरीवाडी (भिलवडी) येथे अनोखा डोहाळेजेवणाचा अविस्मरणीय सोहळा........



भुवनेश्वरीवाडी (भिलवडी) येथे अनोखा डोहाळेजेवणाचा अविस्मरणीय सोहळा .....



भिलवडी | दि. ०१/१०/२०२१

तिच्या डोहाळे जेवणासाठी हिरवी साडी, फुलांचा हार, पाच फळे आणि ओटी हे सारे आणले होते. कृष्णा नदीच्याकाठी असलेल्या भिलवडी मधील भुवनेश्वरीवाडी येथे असलेल्या भुवनेश्वरी मंदिराच्या प्रांगणात भव्य मंडपही घातला होता. शुक्रवार दि.०१/१०/२०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमास सुरवात झाली. साऱ्या भुवनेश्वरीवाडी व परिसरातील आप्तेष्टांना आवतन धाडले होते.या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला व हाळदी कुंकवाला बोलविलेल्या सुवासिनी महिलांनी रितीरिवाजा प्रमाणे सर्व विधी पार पाडला. सुहासिनींनी ओवाळणी करून ओटी भरली. नव्या साडी चोळीची झूल घालून पुष्पहारांनी सजविले.


अगदी थाटामाटात व आनंदमय वातावरणात झालेल्या या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाने कपिला तृप्त झाली. ही कपिला म्हणजे भुवनेश्वरीवाडी येथील एका शेतकरी कुटुंबातील म्हणजेच बाळासाहेब गुरव व त्यांच्या कुटुंबियांची लाडकी खिलारी जातीची पांढरी शुभ्र गाय...


पलूस तालुक्यातील भिलवडी मधील कृष्णानदी काठी असलेल्या भुनेश्वरीवाडी येथील बाळासाहेब गुरव यांच्या कुटुंबियांतील कपिला हि एक सदस्यच आहे. गुरव कुटुंबीयांची सदस्य असणारी कपिला या देशी गायीचे गुरव कुटुंबीयांनी मोठ्या प्रेमाने तिचे संगोपन केले आहे.


हिंदू धर्मात गाईला फार मोठे महत्त्व आहे. गायीमुळे घरी लक्ष्मी वास करते अशी त्यांची श्रधा आहे.कपिला गायीच्या डोहाळेजेवणाच्या निमित्ताने उपस्थितांसाठी भोजनाची सोय करण्यात आली होती सर्वांनी भोजनाचा लाभ घेतला. हा अनोखा डोहाळेेजेवणाचा सोहळा भिलवडी व परीसरात चर्चेचा विषय बनला आहे.