भिलवडी येथे व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व आर.के.फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा...
भिलवडी | दि.15/10/2021
भिलवडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे . आणि आर. के. शैक्षणिक व सामाजिक फाउंडेशन ,महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.
पलूस तालुक्यातील भिलवडी येथील पंचशिल नगरमध्ये दि. १३ आँक्टोंबर रोजी एक दिवसीय व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.
नोकरी मागणारे, बनतील नोकरी देणारे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून,आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात काम करणार आहे असे मत आर. के. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आकाश बुचडे यांनी व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
यावेळी बार्टीचे पलूस तालुका समता दूत सागर आढाव व भारतीय युवा ट्रस्टचे सांगली जिल्हा प्रमुख विशाल चव्हाण यांनी युवा वर्गास व्यवसाय प्रशिक्षणाविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी आर. के. बापू स्वयंसहायता युवा केंद्र माळवाडी, भिलवडीचे सर्व सदस्य, बार्टीचे पलूस तालुका समता दूत सागर आढाव, वाळवा तालुका समता दूध विक्रांत शिंदे ,आर. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आकाश बुचडे, उपाध्यक्ष पूनम बुचडे, भारतीय युवा ट्रस्टचे विशाल चव्हाण, राम कांबळेउपस्थित होते .सदर कार्यक्रम संपन्न होण्यासाठी अभिजीत रांजणे, शेखर साळुंखे व महेश यादव यांनी मोलाचे सहकार्य केले.