पर्दाफाश आंदोलन...
पोखर्णी येथील सरपंच व ग्रामसेविका यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा...
वाळवा, जि.सांगली | दि.१९/१०/२०२१
वाळवा तालुका हा क्रांतीकारकांचा आहे. या तालुक्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील, साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे, क्रांतीवीर नागनाथ नायकवडी, लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी महाराष्ट्राला व देशाला इतिहास दिला आहे.
परंतु महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून दलित बहुजन समाजावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. सामाजिक विकासापासून दलित समाजाला बाजुला ठेवायचे हे काम या आघाडी सरकारने चालवलेले आहे. विशेष करुन महाराष्ट्रामध्ये मातंग समाज मोठ्या प्रमाणात आहे. परंतू दलित वस्ती सुधार योजनेचा निधी मातंग समाजावर खर्च केला जात नाही. यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहेत.
सांगली जिल्ह्यामध्ये दलित वस्ती सुधार योजनेचा निधी मातंग समाजावर खर्च केला जात नाही. या संदर्भात जिल्हाधिकारी सांगली, मुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कल्याण अधिकारी सांगली. गटविकास अधिकारी इस्लामपूर याना समक्ष भेटून निवेदन देऊन चर्चा करण्यात आली आहे.
परंतु पोखर्णी ग्रामपंचायत प्रशासनामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही. पोखर्णी तालुका वाळवा येथील ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच पहात नाहीत. तर त्यांचे दीर नंदकुमार पाटील हे काम पहात आहेत. नंदकुमार पाटील हे दिवसभर ग्रामपंचायतमध्ये बसून असतात ग्रामसेविका मोरे मॅडम ह्या नंदकुमार पाटील यानाच विचारुन कामे करतात त्यानी सांगितल्या शिवाय कोणतेच काम करीत नाहीत. त्याचबरोबर ग्रामसेविका मोरे मॅडम या ग्रामपंचायतीमध्ये रूजू झालेपासून कामावर कधीही वेळेवर येत नाहीत. सर्व सामान्य लोकांना जाणिवपूर्वक ग्रामपंचायत मध्ये दाखले देण्यास टाळाटाळ करीत असतात. या सर्व बाबींचा पर्दाफाश होण्यासाठीच हे आंदोलन करित असल्याची माहिती डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या पदाधिकारी यांनी दिली.
१) ग्रामसेविका मोरे मॅडम यांची खातेनिहाय चौकशी करुन त्याना तातडीने निलंबित करण्यात यावे.
२) दलित वस्ती सुधार योजनेच्या कामाची तातडीने चौकशी करा.
३) सध्या सुरु असणारे दलित वस्ती सुधार योजनेतून पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्यासाठी ५ लाख रुपये खर्च करून ११ पथदिवे बसविले आहेत. याची सुध्दा चौकशी करण्यात यावी.
४) १४ वा वित्त आयोग, १५ वा वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजनेचा आराखडा यामध्ये मातंग समाज्याचा विकासामध्ये समावेश केलेला नाही. याचीही तातडीने चौकशी करण्यात यावी.
५) संतोषनगर पोखर्णी येथील मातंग समाजावर गेल्या २० वर्षामध्ये कोणत्याही योजनेचा एकही पैसा खर्च केलेला नाही.
६) दलित वस्ती सुधार योजनेच्या निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार याना काळ्या यादीमध्ये टाका.
७) पोखर्णी ग्रामपंचायत प्रशासन जाणिवपूर्वक, जातीयद्वेषापोटी व राजकीय द्वेषापोटी काम करीत आहेत. त्यांचे वरती ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. इ.मागण्या सदर निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
वरील सर्व मागण्यांची पूर्तता १ नोव्हेंबर पर्यंत मान्य न झाल्यास दिवाळी दिवसी या जिल्हयाचे पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे.
याची शासन व प्रशासन यंत्रणेने नोंद घ्यावी.
यावेळी मा. अशोकराव वायदंडे
ज. हा. ल. नेते DPI
मा. नंदकुमार नांगरे
राज्य उपाध्यक्ष DPI
मा. सतिश लोंढे
अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र विभागीय
मां. दयानंद चव्हाण आबा
डि सी फौंडेशन संस्थापक
मा. दिलीप कुरणे
महाराष्ट्र प्रदेश संघटक
मा. कबिर चव्हाण
ग्रामीण जिल्हाध्यक्ष
मा. जया माने
महिला आघाडी नेत्या
मा. रामभाऊ देवकुळे
वाळवा तालुका उपाध्यक्ष DPI यांच्या सह आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.