मिरजेत ईद-ए-मिलाद निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न...
मिरज | दि.20/10/2021
ईद-ए-मिलाद हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त इरफानभाई बारगीर चालक-मालक मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती शिवजयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष मा. महादेव नलवडे. बाळासाहेब पाटील , स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीचे मा.उत्तम आबा कांबळे , जिल्हा शहराध्यक्ष इनुसभाई चाबुकस्वार , शौकत मुजावर , सलीम चाबुकस्वार , चांद ढालाईत , चाबुकस्वार मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे मालक आमीन चाबुकस्वार , इंडियन ऑइल डेपो चालक-मालक चे जिल्हाध्यक्ष अंकुश गडदे , साप्ताहिक मिरज वार्ताहारचे संपादक नजीर झारी , प्रकाश लामदाडे , बामसेफचे सागर बळवंत केसरखाने , अण्णा दर्ग्याचे पुजारी शहानवाज पिरजादे , अरुण देवर्षी , प्रमोद सौंदडे , विराज मसराज या सर्वांचे इरफान भाई बारगीर यांनी फुल गुच्छ देऊन स्वागत केले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली
यावेळी महाप्रसादचा 500 ते 600 महिला व नागरिकांनी लाभ घेतला. इरफान भाई बारगीर चालक-मालक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष इरफान भाई बारगीर व सर्व पदाधिकारी सदस्यांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला.