पलूस पोलिसांची मोठी कारवाई...
मोटारसायकलीची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यास मोटारसायकलीसह पलूस पोलिसांनी सापळा रचून केली अटक...
पलूस | दि. 14/10/2021
पलुस व परिसरातील मोटारसायकलीची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यास मोटारसायकलीसह पलूस पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. विनोद हरी चव्हाण, वय वर्ष ३५ रा. संतगांव ता.पलूस मुळ रा.गुलबर्गा कर्नाटक व अभिजीत अशोक चव्हाण, वय वर्ष ४० रा. पलुस ता.पलूस जि.सांगली असे चोट्यांची नावे आहेत. त्यांच्या कडून चोरीस गेलल्या १ लाख ४७ हजार ५०० रूपये किंमतीच्या चार मोटसायकली व एक पाण्याचा पंप जप्त केला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की,१२ ऑक्टोंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास महादेव विठ्ठल जगदाळे रा.अंबक ता.कडेगाव जि.सांगली यांची मोटरसायकल पलूस येथील बाजारपेठ येथून चोरीला गेली होती. याबाबत त्यांनी पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. यापूर्वीही मोटसायकल चोरीच्या तक्रारी पलूस पोलीस ठाण्यात दाखल आहेत. दरम्यान, जगदाळे यांची मोटरसायकल चोरुन नेणारांची गोपनीय माहिती पलूस पोलिसांना मिळाली.
सदर गुन्ह्याचा तपास मा.पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम सो. सांगली, मा. अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले सो. सांगली, व
तासगाव येथील विभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखालील पो. ना. दिलिप गोरे, पो.ना.प्रविण पाटील, पो.ना.नवनाथ धनवडे,पो.ना. गिरीश मोरे, पो.काँ.प्रविण मलमे, पो.काँ.नितिन गोडे, पो.काँ.अमोल कदम, पो.काँ.प्रमोद साखरपे सर्व नेमणूक पलूस पोलीस ठाणे यांच्या पथकाने सापळा रचून आज विनोद हरी चव्हाण व अभिजित अशोक चव्हाण यांना ताब्यात घेतले.
दोघाजणांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी पलूस पोलिस ठाणे हद्दीतून सुझुकी एक्सेस, यामाहा क्रुक्स, होन्डा सी.डी. डिलक्स, होन्डा ग्लॅमर या चार मोटरसायकली व एक किर्लोस्कर कंपनीची १ एच पी ची पाण्याची मोटर चोरुन नेल्याची कबुली दिली आहे.सदरचा हा सर्व मुद्देमाल पलूस पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून हस्तगत केला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.