खंडोबाचीवाडी (ता.पलूस) मधील काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला दुसरा धक्का....
अनेक महिला-पुरुष कार्यकर्ते यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश...
भिलवडी | दि.03/10/2021
काँग्रेस पक्षाचा मजबुत बालेकिल्ला समजल्या जाणा-या खंडोबाचीवाडी, ता. पलुस येथील अनेक महिला-पुरूष कार्यकर्त्यांनी काँग्रेस मधील पक्षांतर्गत कुरघोडीला कंटाळुन काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत जिल्हा परिषदेचे गटनेते मा. शरद भाऊ लाड यांच्या उपस्थितीत दि.०१/१०/२०२१ रोजी 'राष्ट्रवादी काँग्रेस' पक्षात प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने महिला वर्गाने मोठा पुढाकार घेतल्याचे दिसुन आले. खंडोबाचीवाडी गावातील जुने जाणते व्यक्तिमत्व असलेल्या मा. सुदाम बाबर (सर) यांच्या नेत्वृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला.
सुदाम बाबर सर हे खंडोबाचीवाडी गावातील काँग्रेसचे मातब्बर नेते होते परंतु पक्षांतर्गत कुरघोड्यांना कंटाळुन आणि काँग्रेसअंतर्गत वारंवार मिळणा-या वागणुकीला कंटाळत हा पक्षप्रवेश केला असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी यापुढे एकदिलाने व ताकतीने राष्ट्रवादीचे काम करू व येत्या काळात घरोघरी पक्ष रूजवु असा विश्वास व्यक्त केला. जी. डी. बापुंचा वसा आणि वारसा जपत निष्ठेने मा. शरद भाऊंसोबत राहण्याची भावना व्यक्त केली.
काँग्रेस पक्षाला हा लागोपाठ दुसरा झटका बसला आहे.
काही दिवसांपुर्वीच झालेल्या गावातील काही युवकांचा राष्ट्रवादी पक्षातील प्रवेशाने आधीच खिंडार पडलेल्या काँग्रेसचा हा बालेकिल्लाच उध्वस्त झाल्याची चर्चा परिसरात होत आहे.
यावेळी मा. शरद भाऊ लाड यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे अभिनंदन केले व यापुढे खंडोबाचीवाडी गावच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटीबद्ध राहु अशी ग्वाही दिली.
प्रवेश केलेल्या सर्वांना आपल्या राष्ट्रवादी पक्षात न्याय मिळेल तसेच सन्मानाची वागणुक मिळेल. कार्यकर्त्यांच्या नेहमी संपर्कात राहु तसेच कार्यकर्त्यांना त्रास देणा-यांकडे 'बारकाईने' लक्ष ठेऊ अशा शब्द यावेळी मा. शरद भाऊ लाड यांनी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी अनिल जाधव, विलास मगदुम, अक्षय काटवटे, राजु देवकते यांच्यासह गावातील बहुसंख्य महिलांचा पक्षप्रवेश मा. शरद भाऊ लाड यांच्या हस्ते झाला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पलुस तालुका अध्यक्ष मा. मोहन पाटील सर, राष्ट्रवादी चे कार्याध्यक्ष मा. डॉ. विनायक दादा महाडिक, तसेच राष्ट्रवादीचे नेते मा. विशाल जाधव, रोहण यादव, अक्षय शिंदे, दिपक शिंदे, अक्षय माने, युवा नेते विशाल शिंदे, लखन जाधव, रणजित बागल, विकास पवार, खंडोबाचीवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष मा. ॲड. अभिषेक खोत यांच्यासह गावातील मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता.