मिरजेत मुहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून गरजू लोकांना चादरी व अल्पोपहार वाटप...
मिरज
दि. १९ ऑक्टोबर २०२१
प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मिरजेत गोरगरिब निराधार गरजु लोकांना चादरी व अल्पोपहार वाटप करण्यात आले.
लवकरच हिवाळा सुरू होणार त्यामुळे फूटपाथ, रेल्वे स्टेशन, मिरज बस स्टॉप वर असणारे गरजू लोकांना मदतीचा एक हात म्हणून माणुसकीच्या नात्याने हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, जिल्हा महासचिव उमरफारूक ककमरी, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक संजय कांबळे, प्रवक्ते मनोहर कांबळे, मिरज शहर अध्यक्ष सतीश शिकलगार, उपाध्यक्ष निखिल शिकलगार, मानतेश कांबळे, संग्राम मोरे, समीर फौजदार, कृष्णा बोराडे, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.