भिलवडी जायंट्स ग्रुपच्या सप्ताहाची सांगता व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न....
भिलवडी दि.04/10/2021
भिलवडी ता.पलूस येथे नुकताच भिलवडी जायंट्स ग्रुपच्या सप्ताहाची सांगता व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ.सतीश बापट (मेंबर सेंट्रल कमिटी, जायंट्स इंटरनॅशनल) होते तर अध्यक्षस्थानी भिलवडी जायंट्सचे अध्यक्ष सुनील पारिट होते.यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ. सतीश बापट यांनी जायंट्स ग्रुपच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी डॉ. जयकुमार चोपडे व डी. आर. कदम यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.जायंट्स ग्रुपच्या सप्ताहामध्ये विविध उपक्रम राबविले गेले.यामध्ये रक्तदान शिबिराचे संयोजक गैभीसाहेब शेख (मेजर), कलाशिक्षक श्री चिंचवडे यांचा सत्कार डॉ. चोपडे, डॉ बापट यांच्या हस्ते करण्यात आला.
रांगोळी व चित्रकला स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये धनश्री धनंजय मगदूम , प्रथम तर आरती शितल वावरे हिचा द्वितीय तसेच दिव्या सत्यजीत ऐतवडे व साईनाथ संतोष इंगोल यांनी तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल तसेच मोठ्या गटामध्ये प्रियांका खंडेराव पाटील प्रथम क्रमांक, समर्थ जयपाल भदोरिया द्वितीय क्रमांक तसेच गायत्री सत्यशील पाटील व शुभांगी अशोक कुंभार यांनी तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल व चित्रकला स्पर्धेमध्ये सिद्धेश अमर पाटील प्रथम क्रमांक, मयूरेश शार्दूल कोष्टी द्वितीय क्रमांक तसेच धनश्री धनंजय मगदुम हिचा तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल व चित्रकला स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळविले बद्दल भावेश विशाल भवार या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, रोखरक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक सुनिल परीट यांनी केले तर आभार प्रदीप माने यांनी मानले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन के. आर. पाटील यांनी केले.
जायंट्स सप्ताह यशस्वी करण्यासाठी उद्योजक गिरीश चितळे, मकरंद चितळे, भगवान शिंदे, डॉ. वैशाली साळुंखे, गैबीसाहेब शेख, उत्तम मोकाशी , राजेंद्र कुलकर्णी, सुधीर गुरव, डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी यांच्यासह जायंट्स ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.