वाढती महागाई कमी करा, त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द करा, महिलांवरील अत्याचार थांबवा, शेतकर्यांना भरघोस नुकसान भरपाई द्या... अविराज काळीबाग
पलूस : दि. 21/10/2021
पलूस : वाढती महागाई, शेतकरी नुकसान भरपाई, इंधन दरवाढ, त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द करावी , महिलांवरील वाढते अत्याचार थांबवावेत, ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करून , मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, तसेच कोरोनाच्या आजाराने मृत झालेलेंच्या कुटुंबियांना 50 हजारांची आर्थिक मदत मिळावी, सरकारी नोकर्यांमधील खाजगीकरण रद्द व्हावे, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना 50 हजारांची आर्थिक मदत देण्यात यावी, मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्जे माफ करण्यात यावीत आदी विविध मागण्यांचे निवेदन पलूस तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे युवक आघाडी अध्यक्ष अविराज काळीबाग यांचे नेतृत्वाखाली तसेच मा. जिल्हाध्यक्ष जिल्हा नेते राजेश (अण्णा) तिरमारे, तालुका उपाध्यक्ष देवदास कोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, पलूस तालुक्याचे तहसीलदार निवास ढाणे साहेब यांना दि. 20 / 10 / 2021 रोजी देण्यात आले.
यावेळी तालुका रिपब्लिकन पक्षाचे पलूस शहराध्यक्ष अमित कांबळे, युवक आघाडी उपाध्यक्ष सागर कांबळे, तुपारी शाखाध्यक्ष सुशिल क्षीरसागर यांचेसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.