चोपडेवाडी येथील पूरग्रस्तांना जीवनउपयोगी साहित्य व लहान मुलांना शालेय वस्तूंचे वाटप...
भिलवडी | दि.12/10/2021
पलूस तालुक्यात सिवायडीए व युनिसेफ पुणे या सेवाभावी संस्थेच्या वतीने , जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली , प्रकाश शिक्षण प्रसारक संस्था यांचे मार्फत
'नवी उमेद, नवी सुरवात प्रकल्पाच्या अंतर्गत आज दि.12/10/2021 रोजी चोपडेवाडी येथील पूरग्रस्तांना जीवनउपयोगी साहित्य तसेच लहान मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
त्याचबरोबर आज उपस्थित नसलेल्या उर्वरित लोकांना देखील जिवनउपयोगी साहित्य व लहान मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले,या कार्यक्रमाला सिवायडीए व युनिसेफ पुणे यांचे प्रतिनिधी श्री. देशपांडे सर , किशोरी मॅडम , यादव सर , देवकुळे सर तसेच चोपडेवाडी गावच्या सरपंच सौ. इंदुमती यादव , उपसरपंच श्री. अमोल माने , ग्रामसेविका चौगुले मॅडम , ग्रामपंचायत सदस्या जगताप मॅडम , मोरे मॅडम , माने मॅडम व शिक्षक माळी सर,माने मॅडम तसेच अंगणवाडी सेविका तळप मॅडम , मोरे मॅडम, सूर्यवंशी मॅडम, तसेच राजाराम माने हे उपस्थित होते,
सिवायडीए व युनिसेफ पुणे यांचे प्रतिनिधींनी लहान मुले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला व स्वच्छतेचे महत्व पटवून दिले,
या मदतीने गावाला खुपच दिलासा मिळणार असल्याची स्पष्टोक्ती उपसरपंच श्री अमोल माने यांनी यावेळी बोलताना दिली ,भविष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन नियोजन करावे लागेल असे मत श्री. देशपांडे सर यांनी मांडले,
यावेळी चोपडेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच , सदस्य , ग्रामपंचायत कर्मचारी , अंगणवाडी सेविका व मदतनीस व गावातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी चोपडेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमोल माने यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.