खंडोबाचीवाडी (ग्रा.पं.)चे सरपंच धनंजय सदाशिव गायकवाड यांची सरपंच सेवा महासंघाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती...
सांगली | दि. 16/10/2021
सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य च्या सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी ग्रामपंचायत येथील सरपंच श्री धनंजय सदाशिव गायकवाड यांची सांगली जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ही संघटना सरपंचाच्या न्याय व हक्कासाठी लढणारी महाराष्ट्रातील एकमेव नोंदणीकृत संघटना आहे. आज पर्यंत राज्य कार्यकारिणी ने शासनस्तरावर विविध मागण्या मंजूर करून घेतल्या हे उल्लेखनीय आहे.
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी ग्रामपंचायत सरपंच त्यांच्या कामाचा संघटना वाढीसाठी अनुभव बघता त्यांच्या खांद्यावर सांगली जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी कोअर कमिटी च्या निर्णयानुसार राज्य कार्यकारिणी च्या सल्ल्यानुसार सरपंच सेवा महासंघ संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम अंबादास घोगरे, राज्य संपर्कप्रमुख राहुल मारोतराव उके, सांगली जिल्हाध्यक्ष सरपंच रणजित पोपट माने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देउन जिल्हाउपाध्यक्ष जबाबदारी देण्यात आली .
ते आपल्या नियुक्ती चे श्रेय सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राज्याअध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, मानद अध्यक्ष चंद्रकांत बंधाले, कार्याध्यक्ष माधवराव गंभिरे, उपाध्यक्ष बाळासाहेब मस्के, सचिव सुनील राहाटे, राज्य संपर्कप्रमुख राहुल उके, कोअर कमिटी अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, संघटक अन्नासाहेब जाधव, सल्लागार हनुमंत सुर्वे, राज्य कार्यकारिणी सदस्य सतीश साखरे, सोशल मीडिया प्रमुख भाऊसाहेब कळसकर, सरपंच माझा चे संचालक रामनाथ बोर्हाडे,प्रविन शहाने, धनंजय पाटील यांना देत आहे .
त्यांच्या नियुक्ती मुळे सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव व स्वागत होत आहे.