महापूरामुळे नदीकाठच्या लोकांना होणाऱ्या वेदना आपल्या लेखणीतून मांडणारे कादंबरीकार विजय जाधव (बुरुंगवाडी) यांच्या..
'' पाऊसकाळ '' या कादंबरीचा प्रकाशन समारंभ...
भिलवडी | दि. 29/10/2021
मौज प्रकाशन गृह, मुंबई, क्षितीज गुरुकुल विद्यानिकेतन आणि ग्रामपंचायत, बुरुंगवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने, विजय जाधव यांच्या 'पाऊसकाळ' या कादंबरीचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रख्यात साहित्यिक डॉ. राजन गवस, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मोहन पाटील, समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या हस्ते या कादंबरीचे प्रकाशन होणार आहे.
यावेळी प्रख्यात ललित लेखक
जेष्ठ साहित्यक श्रीनिवास विनायक कुलकर्णी,
ग्रामीण कथाकार आप्पासाहेब खोत
मौज प्रकाशन गृह, मुंबईचे श्रीकांत भागवत,
ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन, प्रख्यात लेखक नामदेव माळी
या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. तरी सदर कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे असे आवाहन कादंबरीकार विजय जाधव, बुरूंगवाडी यांनी केले आहे.
शनिवार दि. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता. ब्रह्मानंद महाराज आश्रम (मठ), बुरूंगवाडी, ता. पलूस, जि. सांगली येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष सुनिल जाधव यांनी दिली.