केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला..शेतकऱ्यांच्या बाजुला कोणीही उरले नाही....
.मा.खा. राजू शेट्टी यांनी केला आरोप...
माळवाडी ते औदुंबर रॅलीचे संपूर्ण क्षणचित्रे..पहा " जनशक्ती न्यूज " वरती⤵️
भिलवडी : औदुंबर - दि.०८/१०/२०२१
शेतकऱ्यांचे नेते राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. ७ ते १५ ऑक्टोंबर पर्यंत जागर एफ. आर. पी. चा, आराधना शक्तीपिठांची यात्रा काढण्यात येत आहे. त्यानिमित्ताने राजू शेट्टी व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी औदुंबर येथिल श्री दत्त गुरूंचे दर्शन घेऊन साकडे घातले.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, केंद्रामध्ये भाजपा तर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे प्रमुख पक्ष शेतकरी वर्गाच्या विरोधात निर्णय घेवू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या बाजूला कुणीही उरले नाही. म्हणूनच परमेश्वराला साकडे घालायला आलो आहे. ज्यांच्या पाठीमागे कुणी नसते, त्यांच्या पाठीमागे परमेश्वर असतो.
यावेळी माजी खा. राजु शेट्टी यांनी औदुंबर व परिसरातील शेतकरीवर्गाला जागर यात्रे बद्दल सांगितले. यात केंद्र सरकाराच्या आखतारीत निती आयोग, व कृषीमुल्य आयोग आहेे. त्यांनी ऊसाची एफ.आर.पी. तीन टप्प्यात देण्यासंदर्भात शिफारस केली आहे. त्या संदर्भात देशातील १५ राज्यांकडून शिफारसी मागविल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने तीन टप्प्यात एफ.आर.पी.ला पाठिंबा दिला आहे. यात ऊस गाळप झाल्यानंतर १ महिन्यात ६० टक्के, गाळप हंगाम संपल्यानंतर २० टक्के व उर्वरित आगामी गाळप हंगाम सुरू होण्यापुर्वी २० टक्के द्यावा अशी शिफारस केली आहे.
यात राज्य व केंद्र सरकार यांनी मिळून शेतकरी वर्गाचा विश्वासघात केला आहे. पुन्हा एकदा शेतकरी वर्गाला आर्थिक अडचणीत आणुन त्यांना राजकीय गुलाम बनविण्याचा प्रयत्न या केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरू केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकार व केंद्र सरकार मधील नेतेमंडळी भांडणाची नाटके करीत आहेत. दुसऱ्या बाजुला शेतकरी वर्गाला अडचणीत आणण्यासाठी एकत्र काम करीत आहेत.अशी घाणाघाती टिका राजू शेट्टी यांनी औदुंबर येथे केली.
तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत अन्यायकारक निर्णय घेणाऱ्या शासनाच्या विरोधात शेतकरी वर्गांने एकजुट केली पाहिजे. त्यासाठी चालु गळीत हंगामात सर्व शेतकरी वर्गांने निर्णायक लढ्यासाठी तयार रहा तसेच १९ ऑक्टोंबर रोजी होणारी २० वी ऊस परिषद मोठी करून शासनावर व साखर सम्राटांच्या एक रकमी एफ.आर.पी.साठी दबाव टाकु त्यासाठी शेतकरी बंधूनी जास्तीत जास्त संख्येने या ऊस परिषदेत उपस्थित राहण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.
दरम्यान सांगली , कर्नाळ , नांद्रे , वसगडे , माळवाडी, भिलवडी , औदुंबर येथे जागर एफ. आर. पी. चा.. आराधना शक्तीपिठांची.. यात्रेचे प्रमुख राजू शेट्टी यांचा पुष्पहार घालून, सत्कार करून स्वागत करण्यात आले.याचे चोख नियोजन शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केले.