yuva MAharashtra स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जागर एफ. आर. पी. चा, आराधना शक्तीपिठांची यात्रा... ७ ते १५ ऑक्टोंबर पर्यंत राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार यात्रा...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जागर एफ. आर. पी. चा, आराधना शक्तीपिठांची यात्रा... ७ ते १५ ऑक्टोंबर पर्यंत राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार यात्रा...



स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जागर एफ. आर. पी. चा, आराधना शक्तीपिठांची यात्रा...

७ ते १५ ऑक्टोंबर पर्यंत राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार यात्रा...



भिलवडी |०६/१०/२०२१

एक रकमी एफ आर पी च्या मागणीसाठी
दि.७  ते १५  ऑक्टोंबर पर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली " जागर एफ. आर. पी. चा, आराधना शक्तीपिठाची यात्रा " काढण्यात येणार असून, त्यामध्ये बहुसंख्य शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केले आहे.


केंद्र सरकार, राज्य सरकार व साखर कारखानदार यांनी मिळून एफ. आर. पी. चे तीन तुकडे करण्याचा घाट घातला आहे. याला विरोध दर्शविण्यासाठी व शेतकऱ्यांना एक रकमी एफ. आर. पी.  मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी हे ७ ऑक्टोबर रोजी जागर एफ. आर. पी. चा , आराधना शक्तीपिठांची या यात्रेचा शुभारंभ कोल्हापूर येथून ज्योतिबा ,महालक्ष्मी व आदमापूर येथे  दर्शन घेऊन करणार आहेत , 



हि यात्रा आठ तारखेला सांगली जिल्ह्यात येणार आहे. नांद्रे _ वसगडे येथून मोटारसायकल रॅलीद्वारे ते औदुंबर येथे श्री दत्त दर्शन व शेतकरी मेळाव्यासाठी जाणार आहेत. औदुंबरकडे जात असताना,

राजू शेट्टी यांचे भिलवडी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य मा.संग्राम (दादा) पाटील सह त्यांचे सहकारी  व भिलवडी परीसरातील शेतकर्‍यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. 



आठ ऑक्टोबर रोजी औदुंबर येथे सकाळी ठिक ८:००  वाजता राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचा मेळावा घेऊन, त्यांना एफ. आर. पी. बाबत संबोधित करणार आहेत. 

त्यामुळे प्रशासनाकडून एफ. आर. पी. बाबत होणारी गळचेपी थांबविण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या रॅलीमध्ये व मेळाव्यास उपस्थित राहून, सरकारला शेतकऱ्यांच्या मध्ये असलेली एकी दाखवून द्यावी असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केले आहे.