नागठाणे येथील पूरग्रस्तांचे फेर पंचनामे व्हावेत यासाठी पूरग्रस्त नागरिक व व्यावसायिकांचे बेमुदत आमरण उपोषण...
उपोषणाला सरपंच व सदस्य यांचाही पाठिंबा...
भिलवडी : नागठाणे |दि.21/10/2021
नागठाणे ता. पलूस : जुलै २०२१ मध्ये कृष्णा नदीला आलेल्या प्रलयकारी महापुरानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासनाच्या वतीने अगदी कासवगतीने करण्यात आले. महापुरामध्ये नुकसान झालेल्या पूरग्रस्तांचे घर पडझड , व्यवसायिक दुकानदार , शेतीचे नुकसान , गोठे-जनावरे व इतर पंचनामे करण्यासाठी संपूर्ण महिना लोटला गेला परंतु उशिरा सुरू झालेल्या पंचनाम्यानंतर
प्रत्यक्षात ज्या पूरग्रस्तांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांना मदत कमी आणि महापुराच्या पाण्यापासून दूर असणाऱ्यांना भरघोस मदत गाव पुढाऱ्यांच्या मदतीने शासनाकडून करण्यात आल्याचा घणाघाती आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी यावेळी बोलताना केला. त्याच बरोबर आमच्या मागण्या शासनाने तात्काळ मंजूर नाही केल्या तर इथून पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देखील विजय पाटील यांनी दिला आहे.
संबंधित व्यावसायिक यांची माहिती, पंचनामे ग्रामपंचायत कार्यालयीन असणाऱ्या अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून बोगस पंचनामे करण्याचे पाप काही गाव पुढाऱ्यांच्या कडून करण्यात आल्याबद्धल सणसणीत खुलासाही यावेळी विजय पाटील यांनी केला.
पूरग्रस्तांचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता परस्पर याद्या वरिष्ठ कार्यालयांमध्ये नेऊन कटछाट केल्या आहेत असे सरपंच जगन्नाथ थोरात यांनी यावेळी बोलताना सांगितले त्याचबरोबर सर्वांनाच मदत मिळावी यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे असे देखील म्हणाले.
तर सम्पूर्ण गाव 100% बंद ठेवून व्यापारी संघटनेने यावेळी एकोपा दाखवत अन्याय सहन केला जाणार नाही याची प्रचिती दिली.
भिलवडी,अंकलखोप, सह इतर गावां प्रमाणेच नागठानेच्या व्यावसायिकांना मदत मिळावी अशी ठाम भूमिका नागठाणे येथील व्यापाऱ्यांची,आहे तर नागठाणे ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांनी या लाक्षणिक उपोषणास पाठींबा जाहीर केला.
यावेळी डॉक्टर अभिनंदन नांद्रे सामुदाय आरोग्य अधिकारी नागठाणे यांच्या कडून उपोषणकर्त्याचे आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी नागठाणेचे सरपंच जगन्नाथ थोरात. सदस्य प्रशांत पाटील.विजय माने.नागठाणे गावचे पोलिस पाटील दीपक कराडकर(देसाई).
प्रकाश मांगलेकर भाजपचे तालुका अध्यक्ष विजय पाटील.जयवंत मदने व तमाम नागठाणे गावातील नागरिक व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.