एफ. आर. पी. च्या तुकड्यांचा नका घालू घाट... नाहीतर तुमचीच लावू वाट...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २० वी ऊस परिषद जयसिंगपूर येथे १९ ऑक्टोबर रोजी..
भिलवडी : दि.17/10/2021
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार व शेतकऱ्यांचे नेते राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १९ ऑक्टोंबर रोजी जयसिंगपूर येथे
एफ. आर. पी. च्या तुकड्यांचा नका घालू घाट... नाहीतर तुमचीच लावू वाट...या घोषवाक्यासह २० वी ऊस परिषद होणार आहे.
तीन टप्प्यातील एफ. आर. पी. कुणालाच मान्य नाही एका टप्प्यातच एफ. आर. पी. मिळाली पाहिजे ही प्रामुख्याने सर्वांचीच मागणी आहे. त्याच बरोबर वजनातील काटामारी मुळे शेतकरी व वाहनधारक या दोघांचेही नुकसान होत आहे.ते थांबविणे गरजेचे आहे.ऊसतोडणीसाठी ऊसतोडणी कामगारांच्या कडून शेतकऱ्यांची प्रचंड लूट सुरू आहे. या सर्व बाबींवर तोडगा काढण्यासाठी या ऊस परिषदेसाठी जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे.
म्हणून सांगली जिल्ह्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन २० व्या ऊस परिषदेबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करून, त्याबाबतचे माहिती भिंतीपत्रके लावण्याचे काम करीत आहेत.
आज दि.१७ आक्टोंबर रोजी माळवाडी, भिलवडी,नांद्रे,वसगडेसह जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा, पलूस तालुका अध्यक्ष धन्यकुमार पाटील , मुकेश चिंचवडे , समीर पाटील , रोहित पाटील , विजय पाटील , संतोष मोळाज यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भिंती पत्रके चिकटवून उपस्थितांना ऊस परिषदेमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध मागण्यांची माहिती दिली.यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा म्हणाले की,
शासनावर व साखर सम्राटांच्यावर एक रकमी एफ.आर.पी.साठी दबाव टाकण्यासाठी व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व समस्या यांना वाचा फोडण्यासाठी, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने १९ ऑक्टोंबर रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या २० व्या ऊस परिषदेस उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यानी केले.