भिलवडी शिक्षण संकुलातील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरण कामासाठी आमदार फंडातून तात्काळ निधी उपलब्ध करून देणार...
मा.आमदार मोहनराव कदम..
भिलवडी | दि. 27/10/2021
भिलवडी शिक्षण संस्थेने दर्जा व गुणवत्ता यामध्ये सातत्य टिकवून ठेवीत शिक्षण क्षेत्रात निर्माण केलेली परंपरा व योगदान मोठे आहे.
शिक्षण संकुलातील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरण कामासाठी आमदार फंडातून तात्काळ निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन आमदार मोहनराव कदम यांनी केले.
भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेतील संगणक कक्षाचे उद्घाटन व सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी मधील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे होते.
आमदार मोहनराव कदम यांच्या फंडातून खाजगी मराठी प्राथमिक शाळेस दहा संगणक संच व प्रिंटर तर सेकंडरी स्कूल भिलवडी या शाखेस पाच संगणक संच भेट देण्यात आले आहेत.
विश्वास चितळे यांच्या हस्ते भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने आमदार मोहनराव कदम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे,विश्वस्त जे.बी.चौगुले,संचालक गिरीश चितळे,राजू (दादा) पाटील,
डी.के.किणीकर,डॉ.सुनिल वाळवेकर,जयंत केळकर,संजय कदम,सुरैय्या तांबोळी,प्रा.मनिषा पाटील,प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे,मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,विद्या टोणपे,स्मिता माने,सुचेता कुलकर्णी आदींसह सर्व विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
संस्था सचिव संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले,शशिकांत उंडे यांनी पाहुणे परिचय, संजय मोरे यांनी सूत्रसंचालन केले,पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे निवेदन प्रा.महेश पुजारी त्यांनी केले, तर शुभांगी मन्वाचार यांनी आभार मानले.