मोर्चामध्ये नुकसानभरपाई पासून वंचित पूरग्रस्तांचा मोठ्या प्रमाणात सहभाग...
पलूस | दि. 29/10/2021
जुलै २०२१ ला आलेल्या महापुरामध्ये कृष्णाकाठच्या नागरिकांचे प्रापंचिक, व्यवसायिक व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यातील काही नागरिकांना मदत मिळाली परंतु बहुतांश पूरग्रस्त नागरिक नुकसान भरपाई अनुदानापासून वंचित राहिले आहेत अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या वतीने पलूस तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) यांच्या वतीने ज्या लोकांचे अजून पर्यंत सानुग्रह अनुदान जमा झाले नाही, घर पडझडीचे पंचनामे झाले आहेत परंतु पैसे जमा झाले नाहीत तसेच व्यापारी वर्गाच्या नुकसान भरपाई अनुदानाची रक्कम जमा झाली नाही किंवा पात्र-अपात्र असा निकष लावला आहे.अशा नुकसान भरपाई अनुदानापासून वंचित राहिलेल्या पुरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पलूस तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
पलूस तालुक्यातील सर्व पूर बाधित गावांमध्ये ज्या ज्या संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामे केलेले आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी...
फेर पंचनामे करून खऱ्या पूरग्रस्तांना तात्काळ अनुदान मिळावे...
पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांना 50,000/- रुपये मदत द्यावी , 50% वीज बिल माफ करावे , वीज कनेक्शन तोडण्यात सक्ती करू नये...
मागासवर्गीय लोकांच्यावर अन्याय अत्याचार चालू आहे तरी राज्य शासनाने योग्य त्या प्रतिबंधक कारवाई कराव्यात अशा आशयाचे निवेदन पलूस तालुक्याचे तहसीलदार निवास ढाणे यांना देण्यात आले...
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राजेश तिरमारे, पलूस तालुका अध्यक्ष बोधिसत्व माने, युवक आघाडी तालुकाध्यक्ष अविराज काळेबाग, कार्याध्यक्ष अमरजीत कांबळे, सागर बनसोडे, भिलवडी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल कुंदे, सोमनाथ कांबळे,कुंदन कुरणे, विजय कांबळे यांच्या सह आर.पी.आयचे सर्व सदस्य, पदाधिकारी व मदतीपासून वंचित असलेले पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर मोर्चा राजू तिरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व बोधिसत्व माने, देविदास कोकळे, अविराज काळेबाग, अमरजीत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.