yuva MAharashtra पलूस : भिलवडी खाजगी मराठी प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न...

पलूस : भिलवडी खाजगी मराठी प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न...



पलूस : भिलवडी खाजगी मराठी प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न...



भिलवडी | दि.15/11/2021

पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे सन २००० च्या इयत्ता ४ थी तुकडी ब मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर उत्साहात संपन्न झाले.विद्यालयाचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.


२१ वर्षाच्या कालावधीनंतर माजी विद्यार्थी एकत्रित येऊन त्यांनी स्नेह मेळावा आयोजित केला.शाळा व शिक्षकांचे प्रती कृतज्ञता व्यक्त केली.तुम्ही नोकरी किंवाबं उद्योगाच्या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यरत आहात मात्र अशा मेळाव्याचे आयोजन केल्याने विद्यार्थी मित्र म्हणून तुम्ही आजही एकत्रित आहात,परस्परांना विविध पातळीवर मदत करीत आहात ही आनंदाची व समाधानाची बाब असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी यावेळी केले.


प्रमुख पाहुणे हास्यस्त्राकार शरद जाधव यांनी हलक्या फुलक्या विनोदाच्या माध्यमातून उपस्थितांचे मनोरंजन केले.सौ. छाया पाटील,सौ. संध्यारणी भिंगारदिवे,संजय पाटील, किरण चौगुले,विठ्ठल खुटाण, पूजा गुरव आदी शिक्षकांसह उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील विविध आठवणींना उजाळा दिला.शाळा व शिक्षकांच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व कसे आकारास आले याबद्दल ही माहिती सांगितली.


विद्यार्थ्यांनी उपस्थित गुरुजनांचा सत्कार केला.पृथ्वीराज गुरव व सागर आवळे यांनी विविध गीतांचे सादरीकरण केले.
प्रास्ताविक व स्वागत अभिजित जाधव यांनी केले,सूत्रसंचालन  सोनाली मोरे,सुजाता साबळे यांनी केले आभार मकरंद मोकाशी यांनी मानले.



विकास आरागे,विशाल माळी,स्वप्नील मोरे,विशाल कुलकर्णी,रोहित पाटील,अक्षय पाटील,प्रशांत चव्हाण,रोहन चौगुले,किरण खैरमोडे,अजिंक्य गायकवाड,सूर्यकांत कदम,प्रमोद होगले,अमोल जाधव,वैभव होगळे,सोनाली तावदर,शुभांगी मगदूम,अंकिता पाटील,नयन ऐतवडे आदींनी संयोजन केले.