खंडोबाचीवाडी येथील भाजपचे पलूस तालुका माजी सरचिटणीस मा.अरुण जाधव यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश....
भिलवडी | दि.11/11/2021
पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी गावचे सुपुत्र. पलूस तालुका भाजपाचे माजी सरचिटणीस मा.अरूण लक्ष्मण जाधव यांनी आज पलूस तालुक्याचे काँग्रेसचे नेते , सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक मा.महिंद्र (आप्पा) लाड यांच्या उपस्थित काॅंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी खंडोबाचीवाडी येथील काँग्रेसचे नेते विजय (आण्णा) शिंदे , माणिक (तात्या) माने , बाळासाहेब जमादार , उत्तम (आण्णा) जाधव , प्रताप शिंदे , प्रशांत शिंदे , उत्तम मगदूम(दाजी) व ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच , सदस्य यांचे सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.