भिलवडी व परिसरातील दिव्यांग बांधवांसाठी तो आता मसीहा बनलाय.....
.दिपक पाटील....
भिलवडी | दि. 20/11/2021
तो अपंग आहे.. पण त्याची धडपड आणि जिद्द बघून आपल्याला वाटतं की आपणच पाय मोडके आहोत..
त्याचे शब्दोच्चार आपल्याला कळत नाहीत. पण भावना समजतात..
त्याला धड चालताही येत नाही पण त्याचा वावर सगळीकडेच असतो..
पल्स पोलिओचा प्रचार करताना प्रत्येक भिलवडीकराने त्याला पाहिलाय..
आपण अपंग आहोत.. आपल्याला बोलता चालता येत नाही हे तो कधीच विसरलाय..
आपल्या दिव्यांग बांधवांसाठी भिलवडी तालुका पलूस येथील संजय चौगुले हा भिलवडी व परिसरातील दिव्यांग बांधवांचा मसीहा बनलाय.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या व्यापारी संघटनेच्या वतीने भिलवडीच्या ऐतिहासिक कृष्णा घाटावर विविध उपक्रमांचं आयोजन केलं होतं.
त्यामध्ये सिद्धिविनायक शिंदे यांच्या स्थानिक आध्यात्मिक सभा आणि राज्यमंत्री विश्वजित दादांच्या वतीने देण्यात आलेल्या वह्यांचे वाटप आम्ही दिव्यांग बांधवांच्या मुलांना केलं.
त्यातील काही मुलांना वह्या द्यायच्या राहिलेल्या होत्या.संजूनं तीन चाकी सायकलीवरून जाऊन त्यांच्या वह्या पोहोच केल्या. त्याला नीट चालताही येत नाही पण त्याची धडपड-तळमळ पाहून भावनावश झालो.
संजू मधलं हे गाणं आमच्या संजूसाठीच लिहिलेलं आहे असं मला वाटतं...दिपक पाटील
घायल परिंदा है तू..
दिखला दे ज़िन्दा है तू..
बाक़ी है तुझमें हौसला
तेरे जुनूँ के आगे..
अम्बर पनाहें माँगे..
कर डाले तू जो फैसला
रूठी तकदीरें तो क्या..
टूटी शमशीरें तो क्या..
टूटी शमशीरों से ही हो
कर हर मैदान फ़तेह..
कर हर मैदान फ़तेह..