जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी विभागाचा मनमानी कारभार....
श्रीमती प्रियदर्शनी माने, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती प्रकल्प सहाय्यक ( निवडणूक विभाग )सोलापूर, यांची खातेनिहाय चौकशी करून निलंबनाची कारवाई करा...
आर.पी.आय(A) प्रदेश संघटन सचिव, युवक आघाडी दीपक चंदनशिवे यांची मागणी....
________________________________________________
सर्व सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के. मो.नं. 7028640700
bhausoruptakke61@gmail.com
________________________________________________
पंढरपूर | दि. 28/11/2021
सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती प्रकल्प सहाय्यक (निवडणूक विभाग) श्रीमती प्रियदर्शनी माने या मनमानी कारभार करत असून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी उद्धट वर्तन करून अपमानित करतात आणि कामासाठी आर्थिक मागणी करत असल्याचा थेट आरोप करत त्यांच्यावर खातेनिहाय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संघठन सचिव युवक आघाडी दिपक चंदनशिवे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली असून याबाबतचे निवेदन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणे व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांना पाठवण्यात आले आहे. यावेळी दत्ता वाघमारे, समाधान बाबर, संतोष नन्नवरे, विजय कुमार खरे, राजकुमार भोसले , महादेव सोनवणे, श्रीनाथ बाबर , दत्तात्रय बनसोडे, सुजित सोनवणे , शंकर चंदनशिवे , रवी भोसले खंडू बाबर उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती प्रकल्प सहाय्यक (निवडणूक विभाग) प्रियदर्शनी माने या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना नाहक त्रास देत असून जिल्ह्यातून आलेल्या प्रतिनिधींना कामासाठी हेलपाटे मारायला लावत आहेत .निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक आयोगाकडे जात प्रमाणपत्र सादर करणे महत्त्वाचे असल्याने अनेक वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी जात प्रमाणपत्र पडताळणी ऑफिस मध्ये लोकप्रतिनिधींना आपले जात प्रमाणपत्र सर्टिफिकेट घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. प्रमाणपत्र तयार झाली की नाही हे पाहण्याकरता जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन खेड्यापाड्यातून लोकांना वेळ आणि पैसा विनाकारण वाया घालवावा लागत आहे.
जात पडताळणी प्रमाणपत्र तयार झाली की नाही अथवा त्रुटी निघाली आहेत का अशी विचारणा करणाऱ्या प्रतिनिधींना त्यांच्या अंगावर त्यांची पावती फेकणे , अर्वाच्च भाषेत धमकावणे जाणीवपूर्वक काही वेळ थांबवून घेऊन पैशाची मागणी करणे असे प्रकार या विभागात घडत असल्याचा थेट आरोप निवेदनामध्ये करण्यात आला आहे. तसेच या विभागातील कर्मचारी या महिला असल्याचा गैरफायदा घेऊन त्या संपुर्ण ऑफिसमध्ये वरिष्ठांना ही जुमानत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत अशा महिला कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करावी आणि त्यांचे निलंबन करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने करण्यात आले आहे. सात दिवसाच्या आत मध्ये सदर कारवाई नाही झाल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.