yuva MAharashtra भिलवडी परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणारे नागरिक , दुकानदार-ग्राहक , आस्तापना चालक व प्रवासी यांच्यावर होणार आता दंडात्मक कारवाई.....

भिलवडी परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणारे नागरिक , दुकानदार-ग्राहक , आस्तापना चालक व प्रवासी यांच्यावर होणार आता दंडात्मक कारवाई.....





भिलवडी  परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणारे नागरिक , दुकानदार-ग्राहक , आस्तापना चालक व प्रवासी यांच्यावर होणार  आता दंडात्मक कारवाई.....

भिलवडी | दि.29/11/2021

 महाराष्ट्रात  कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोरोना  विषाणूचा संसर्ग व पादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर नियंत्रण करण्याचे व कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे.  सदर नवीन नियमावलीप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी  फिरत असताना मास्क वापरणे बंधनकारक केले असून सदर नियमांचा भंग केल्यास ५०० रुपये दंडाची तरतूद केली आहे. तसेच आस्थापना व दुकानदार यांनी ग्राहकांना विना मास्क प्रवेश दिल्यास ग्राहकांना ५०० रुपये दंड व दुकानदार व आस्थापना चालक यांना १००० रुपये दंड तसेच खाजगी  प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये विना मास्क पॅसेंजर असल्यास मालकास १०,००० रुपये व चालकास ५०० रुपये व गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस ५०० रुपये दंडाची तरतूद केली आहे.


 भिलवडी परिसरातील नागरिकांनी तसेच दुकानदार-ग्राहक , प्रवासी वाहतूक करणारे व आस्तापना चालक  यांनी  शासनाच्या नियमांचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांनी केले आहे.