yuva MAharashtra भिलवडी येथील वंचित मागासवर्गीय पूरग्रस्तांना तात्काळ अनुदान द्या... चुकीचे पंचनामे करणारे , यादी तयार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा... फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच सांगली .यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी...

भिलवडी येथील वंचित मागासवर्गीय पूरग्रस्तांना तात्काळ अनुदान द्या... चुकीचे पंचनामे करणारे , यादी तयार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा... फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच सांगली .यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी...



भिलवडी येथील वंचित मागासवर्गीय पूरग्रस्तांना तात्काळ अनुदान द्या...

चुकीचे पंचनामे करणारे , यादी तयार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा...

फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच सांगली .यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे
निवेदनाद्वारे मागणी...



सांगली |  दि. 13/11/2021

सांगली : फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच सांगली .यांच्या वतीने जिल्हाधिकारी सांगली यांना -मौजे भिलवडी येथील पूरग्रस्त निधी बाबत निवेदन देण्यात आले. भिलवडी गावातील वार्ड क्रमांक 1 व 6 मधीलनागरिक जुलै सन 2021 मध्ये आलेल्या कृष्णा नदीच्या महापुरातील खरे पूरग्रस्त असून पंचशील नगर ,साठे नगर ,साखरवाडी ,मौलाना नगर ,दत्त नगर ,वसंतदादानगर हे (रेड झोन )मधील पूर पट्ट्या मधील नागरीक असून तेथील सर्व पूरग्रस्त नागरिक अनुसूचित जाती जमातीतील लोक  असून त्यांचे हातावरील पोट असताना शासनाच्या नियमानुसार पंचनामे होऊन देखील. अनेक दिवस विनंत्या करून 'निवेदन व उपोषण करून देखील प्रशासना कडून दखल घेतली जात नाही .


सन 2021मध्ये पूरग्रस्त अनुदान मंजूर झाले असता .अनेक लोकांना 2021च्या यादीमधून जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे .आणि बोगस बनावट व चुकीचे पंचनामे करून 2021 ची पूरग्रस्त यादी तयार करून बेकायदेशीरपणे शासकीय अनुदान वाटप करण्यात आले आहे . वार्ड क्र. 1 व 6 मधील नागरिकांना न्यायाच्या दृष्टीने योग्य व आवश्यक असताना .ते त्यांना अनुदान शासकीय अधिकाऱ्यांनी व स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी यांनी जाणीवपूर्वक अनुदान मिळू दिले नाही .तरी चुकीच्या पद्धतीने घर पडझडीच्या व व्यापारी दुकानाचे सर्वे करून त्यांना पात्र ठरविले आहे. अशा चुकीचे सर्वेक्षण करून शासकीय निधीचा गैरवापर केलेला आहे. 


सन 2021 च्या पूरग्रस्त यादी मधील पूरग्रस्त हे मागासवर्गीय समाजाचे असून त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय अत्याचार केला आहे .त्यामुळे चुकीचे पंचनामे करणारे , यादी तयार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणे हे योग्य आहे .आपण तत्काळ संबंधित अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आपण दाखल न केल्यास आम्ही संबंधित अधिकाऱ्यावर अट्रोसिटी कायद्याअंतर्गत योग्य त्या कोर्टात दाद मागणार आहे .

तत्पूर्वी वार्ड क्रमांक एक व सहा पूरग्रस्त नागरिकांना निधी लवकर मिळावा अशी सांगली जिल्हा फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या वतीने निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले .


यावेळी फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते नितीन गोंधळे , दीपक कांबळे , नितीन काळे , मधुकर कांबळे , महादेव नाईक , ॲड. सदानंद नागावकर , वैभव रांजणे , संदीप कांबळे , बाळु कांबळे, खांडेकर , नितीन कांबळे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.





Tags