yuva MAharashtra ऑल इंडिया मुस्लिमओबीसी पदाधिकारी निवडीसाठी मेळावा... सांगली जिल्हा कार्यकारणी होणार जाहीर...

ऑल इंडिया मुस्लिमओबीसी पदाधिकारी निवडीसाठी मेळावा... सांगली जिल्हा कार्यकारणी होणार जाहीर...



ऑल इंडिया मुस्लिमओबीसी पदाधिकारी निवडीसाठी मेळावा... 
   
सांगली जिल्हा कार्यकारणी होणार जाहीर...

वांगी | दि.०४/११/२०२१

 ऑल इंडिया मुस्लीम ओ.बी.सी. संघटनेची पदाधिकारी निवडी संबंधी व मुस्लीम ओ.बी.सी. आरक्षनाविषयी ठोस भुमिक घेण्यासाठी संघटनेची जिल्हास्तरीय बैठक शनिवार दि. ६/११/२०२१ रोजी आदर्श महाविद्यालय मायनी रोड, विटा येथे सकाळी ११ वाजता राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर भाई अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली आहे. अशी माहीती सांगली जिल्हाध्यक्ष श्री. राजूभाई शिकलगार यांनी दिली. 
       ऑल  इंडिया मुस्लीम ओ. बी. सी. संघटनेमध्ये सांगली जिल्हयातील सर्व तालुकाध्यक्ष व पदाधीकारी यांच्या फेरनिवडी करणे. राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर भाई अन्सारी यांच्या हस्ते निवडी जाहीर करने. संघटनेच्या कामकाजाला गतीमान करने व मुस्लीम समाजाच्या विविध सामाजीक प्रश्नावर चर्चा करनेसंबधी जिल्हास्तरीय बैठक घेणेत आलेली आहे. तरी सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सदर बैठकीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन मा. जिल्हाध्यक्ष राजूभाई शिकलगार यांनी केले आहे. 
        मुस्लम ओ.बी.सी. आरक्षणाचा प्रश्न अनेकवर्षे प्रलंबीत असून मुस्लिम आरक्षणासंबंधी राज्यातील कोणताही पक्ष ठाम भुमीका घेत नाही. न्यायालयाने मुस्लिम आरक्षण देण्यासंबंधी सकारात्मक भूमिका घेऊन सुद्घा राजकीय इच्छाशक्ती अभावी मुस्लिम आरक्षण प्रलंबीत आहे. यावर राज्यभर मुस्लीम समाजाचे प्रबोधन करून मुस्लिम समाजाला आरक्षनासंबंधी जागृत करने याहेतूने सदरील बैठक आयोजित करणेत आली आहे. 
         बैठकीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीरभाई अन्सारी हे उपस्थित रहाणार असलेने सांगली जिल्हयातील तमाम कार्यकर्ते व पदाधीकारी तसेच मुस्लिम समाजासाठी योगदान देऊ इच्छिानाऱ्या सर्व युवकांनी पदाधीकारी निवड प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा. सदरील पदाधिकारी निवडप्रक्रिया मुलाखत घेऊन पारदर्शी होणार आहे तरी, बहुसंखेने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजूभाई शिकलगार यांनी केले आहे.