एस.टी.कामगारांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले यांचे उपोषण....
मुख्यमंत्री, परिवहन मंत्री व न्यायालयाचा आदेश येत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही.... संग्राम थोरबोले.
पलूस | दि. 08/11/2021
एस. टी. महामंडळाचे शासनात विलीनकरण करून चालक,वाहक, यांत्रिक कनिष्ठ वेतन श्रेणी कामगार, कर्मचारी यांना शासकीय राज्य कर्मचारी प्रमाणे वेतन व दर वर्षी वेतन वाढ व महागाई भत्ता,ग्रेड पे,घर भाडे व नियमित वेतन मिळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पलूस येथे एस. टी. कामगार व कर्मचारी संघ यांच्या चालू असलेल्या तिसऱ्या दिवशी संपाला दि. 7/11/2021 रोजी कुंडल ता.पलूस चे सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले यांनी एस. टी. कामगार कर्मचारी काम बंद आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन ते स्वता एस. टी. कामगार व कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी पलूस एसटी आगार येथे उपोषणाला बसले आहेत.
यावेळी बोलताना संग्राम थोरबोले म्हणाले की पोलीस प्रशासन व एस.टी. महामंडळातील अधिकारी यांनी माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये.जो पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांच्या कडून या एस. टी. कामगार व कर्मचारी यांच्या मागण्या मान्य केल्याचा आदेश येत नाही व एस. टी. कामगार व कर्मचारी यांना त्यांचा हक्क व अधिकार मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही.
यावेळी उपस्थित सर्व आंदोलक यांनी कामगार व कर्मचारी कंत्राटीकरण करणाऱ्या जातीवादी काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना व राज्यातील ठाकरे सरकार व केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करून सरकारच्या जन विरोधी धोरण व नीती विरुद्ध घोषणा देण्यात आल्या.