आष्टा तालुका स्वतंत्र झाला पाहिजे या मागणीसाठी आष्टा तहसिल कार्यालयासमोर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया DPI पक्षाचे ठिय्या आंदोलन....
आष्टा | दि.३० / ११ / २०२१
आष्टा तालुका स्वतंत्र झाला पाहिजे व अप्पर तहसिलदार कार्यालय या ठिकाणी प्रशासकीय इमारत बांधण्यात यावी या मागणीसाठी DPI पक्षाच्या वतीने आष्टा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.
आष्टा या शहराची ओळख सव्वालाखी आष्टा म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. आष्टा शहर हे मध्यवर्ती ठिकाणी असून या शहरामध्ये शाळा, कॉलेज, महाविद्यालय ,हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, एस. टी. स्टॅन्ड, कापड पेठ, भाजी मार्केट, बॅंका व इतर अनेक सुविधा या शहरामध्ये उपलब्ध आहेत. या शहराला जोडणारी अनेक गावे जवळ जवळ आहेत. सध्या अप्पर तहसिलदार कार्यालयामध्ये पाच सर्कल विभागातील काम सुरू आहे. अनेक सुविधा या कार्यालयातून मिळत नाहीत.यासाठी हा तालुका स्वतंत्र झाल्याशिवाय लोकांना हव्या असणाऱ्या सुविधा मिळणार नाहीत. आष्टा तालुका स्वतंत्र व्हावा ही मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु या ठिकाणचे प्रस्थापित राजकारणी, शासन व प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. छोटा तालुका जरी झाला तरी या तालुक्याचा विकास होऊ शकतो व लोकांना सुविधा मिळू शकतात वाळवा तालुका हा सर्वात मोठा तालुका असल्यामुळे या तालुक्याचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. विकास व्हायचा असेल तर आष्टा तालुका होणे गरजेचे आहे व या ठिकाणी प्रशस्त अशी इमारत बांधण्यात यावी. या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
शासन व प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सदर निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे.
१) आष्टा तालुका स्वतंत्र झाला पाहिजे.
२) अप्पर तहसिलदार या कार्यालयाच्या ठिकाणी प्रशासकीय इमारत बांधण्यात यावी.
३) पुरवठा विभाग, रेकॉर्ड रुम, निवडणूक शाखा, संजय गांधी निराधार पेन्शन योजना व अन्य सुविधा या ठिकाणी सुरू करण्यात याव्यात.
४) अप्पर तहसिलदार कार्यालयातील कामकाज पारदर्शक करण्यात यावे.
इत्यादी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी या आंदोलनास
मा. नंदकुमार नांगरे राज्य उपाध्यक्ष
मा. अशोकराव वायदंडे जहाल नेते
मा. दिलीप कुरणे राज्य संघटक
मा. सतिश लोंढे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र
मा. कबीर चव्हाण सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष
मा. प्रविण वारे अध्यक्ष वाळवा तालुका युवक
मा. मोहन वारे उपाध्यक्ष वाळवा तालुका
मा. रामभाऊ देवकुळे उपाध्यक्ष वाळवा तालुका
मा. राहुल वारे शहर अध्यक्ष
मा. करण वारे शाखा प्रमुख मिसळवाडी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.