स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एक रकमी एफ आर पी साठी जत साखर कारखाना राजारामबापू युनिट नंबर 4 या ठिकाणी आंदोलन....
___________________________________________________
जत | दि. 20 डिसेंबर 2021
जत साखर कारखाना राजारामबापू युनिट नंबर 4 या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एक रकमी ऊस दरासाठी आंदोलन झाले. आंदोलनाची सुरुवात जत बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण तसेच अभिवादन करून जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल रॅलीला प्रारंभ झाला. सदर मोटरसायकल रॅली कारखाना स्थळावर आल्यानंतर रॅलीचे रूपांतर सभेमध्ये झाले.
यावेळी बोलताना संदीप राजोबा म्हणाले या कारखान्यासाठी गाळपास येणार्या ऊसाला इथून कर्नाटक राज्यात गाळपास जाणाऱ्या ऊसाला कॅम्पवाड व नागनुर साखर कारखान्याने एकरकमी सत्तावीस शे रुपये भाव दिला आहे त्या प्रमाणे तुमच्या कारखान्याने सत्तावीस शे रुपये तात्काळ द्या तसेच कारखान्यातून निघणाऱ्या धुराच्या प्रदूषणामुळे भागातील द्राक्ष डाळिंब व इतर पिकांवर राख पडल्यामुळे त्याचा पिकावर विपरीत परिणाम होत आहे ती तात्काळ बंद व्हावी अन्यथा प्रदूषण बोर्डाकडे रीतसर तक्रार करण्यात येईल. तिसरी मागणी कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या दूषित सांड पाण्यामुळे त्या परिसरातील दुष्काळी भागातील विहिरीला असलेले पाणीसुद्धा दूषित होत चालले आहे त्याचाही बंदोबस्त करावा तसेच मागील वर्षी 26 शे रुपये भाव देतो म्हणून ऊस आणला आहे व तो 22 शे रुपये प्रमाणे दिला आहे तरी फरकाचे चारशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करा असे निवेदन कारखाना प्रशासनाला देण्यात आले.
या बैठकीमध्ये कारखान्याचे अधिकारी व शेतकऱ्यांच्या मध्ये वादावादी झाली. तसेच पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली मागण्या मान्य न झाल्यास कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बेमुदत ठीया आंदोलन करण्याचा तसेच होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सर्वस्वी कारखाना प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष संजय बेले तालुकाध्यक्ष रमेश माळी युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष भीमाशंकर बिराजदार जिल्हा उपाध्यक्ष सुरेश गागरे स्वाभिमानी सिद्धगोडा बिरादार
धोंडप्पा बिराजदार राजकुमार बिराजदार मल्लिकार्जुन बिरादार संगाप्पा खोत साहेबांना ककमरी जत तालुक्यातील पूर्व भागातील सर्व शेतकरी उपस्थित होते.
________________________________________________