yuva MAharashtra अंकलखोप पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा 407 टेंम्पोने दोन मोटार सायकलींना दिली जोरदार धडक....

अंकलखोप पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा 407 टेंम्पोने दोन मोटार सायकलींना दिली जोरदार धडक....



अंकलखोप पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा 407 टेंम्पोने  दोन मोटार  सायकलींना दिली जोरदार धडक....

एकजण गंभीर जखमी....
---------------------------------------------------------------------

संपादक - भाऊसाहेब रुपटक्के

---------------------------------------------------------------------
भिलवडी | दि. 21 डिसेंबर 2021

पलूस तालुक्यातील अंकलखोप पेट्रोल पंपाजवळ आष्टा - तासगाव रोडवर टाटा 407 टेम्पो चालकाने बेजबाबदारपणे व रस्त्याचा अंदाज नघेता भरधाव वेगाने टेम्पो चालवून रस्त्याच्या कडेला लावलेल्या एका मोटारसायकलीला व समोरुन येणाऱ्या एका  मोटारसायकलीला  जोरदार धडक देऊन एका व्यक्तीला गंभीर जखमी केले आहे.
  हा अपघात सोमवार दिनांक 20 डिसेंबर 2021 रोजी अंकलखोप गावच्या हद्दीत सायंकाळी 7:30 वा.सुमारास घडला आहे.


 भिलवडी पोलीस ठाणे यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार अंकलखोप पेट्रोलपंपा जवळ  रस्त्याच्या साईड पट्टी वरून एका इसमाची मोटरसायकल स्लिप होऊन तो खाली पडला होता. त्यावेळी वर्दिदार पवन संतोष मुळीक वय वर्षे 17 (धंदा-शिक्षण) राहणार औदुंबर मळीभाग तालुका पलूस याने त्या इसमाला उठवून बाजूला घेत असताना आष्टा-तासगाव  डांबरी रोड वरून भरधाव वेगात जाणाऱ्या  MH - 11-  T -  8779 या टाटा 407 टेंम्पो ने रस्त्याच्या साईड पट्टीवर उभा असलेल्या युनिकॉर्न MH 10 DA - 4626 या मोटारसायकलीला जोरदार धडक दिल्यामुळे वर्दिदार पवन संतोष मुळीक याच्या डाव्या पायावर येऊन ती मोटरसायकल जोरात आदळल्याने त्याच्या मांडीचे हाड मोडून तो गंभीर जखमी झाला. एवढे होऊन सुद्धा हा टेम्पो न थांबता रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या  नं. MH - 09 - AJ  5412 या कावासाकी मोटारसायकलला जोरदार धडक देऊन टेम्पो रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला. सदरची घटना घडल्यानंतर तिथून टेम्पो चालकाने पलायन केले असून  अपघातामध्ये दोन मोटारसायकली व टेम्पोचे मोठे नुकसान झाले  तर अपघातातील वर्दीदार पवन मुळीक रा.औदुंबर मळीभाग  हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर दवाखान्यात उपचार चालू आहेत. अज्ञात टेम्पो चालकाच्या विरोधात भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून भिलवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ श्री. वंजारे पुढील तपास करीत आहेत.

-------------------------–-----------------------------------------


--------------------------------------------------------------------